Your Own Digital Platform

वाठार स्टेशन येथे धूम स्टाईल मोटरसायकलीवर पोलिसांची धडक कारवाई

मोटरसायकलीवर कारवाई करताना वाहतूक पोलीस व पोलिस अधिकारी. 


आदर्की : वाठार स्टेशन पोलिसांच्याकडून वाग्देव चौकात नाकाबंदी करण्यात आली होती. महाविद्यालयाच्या समोरून येणार्‍या जाणार्‍या ट्रिपल सीट मोटरसायकल, बिना नंबरच्या मोटरसायकल, फॅन्सी नंबरच्या मोटरसायकल, शाळेच्या समोरून फिरणार्‍या धूम स्टाईल मोटरसायकलीवर कारवाई करण्यात आली.

या कारवाईमध्ये विनापरवाना गाडी चालवणे गाडीसोबत कागदपत्रे न बाळगणे इत्यादी प्रकारचे गुन्हे वाठार स्टेशन पोलिसाकडून मोटरसायकल चालकाकडे करण्यात आले. वाग्देव विद्यालय व कॉलेज सुटल्यानंतरच्या दरम्यान वाग्देव चौक ते वाठार स्टेशन एसटी स्टँड पर्यंत मोटरसायकल सुसाट वेगात पळवल्या जातात. या मोटरसायकलीवर तीन तीन जण बसलेले असतात, या सुसाट धूम स्टाईल मोटरसायकलीवर कारवाई करणे अत्यंत गरजेचे असून यामुळे अपघात होण्याची शक्यता असते. याबाबतच्या तक्रारी वारंवार ग्रामस्थांकडून पोलिसांकडे होत असल्यामुळे आज बुधवार दिनांक 13 फेब्रुवारी रोजी पोलीस उपविभागीय अधिकारी कट्टे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच वाठार स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री मारुती खेडकर व सर्व पोलीस कर्मचारी यांच्याकडून वाठार स्टेशन येथील वाग्देव विद्यालयासमोर नाकाबंदी करण्यात आली होती.या नाकाबंदी दरम्यान 32 ते 33 मोटरसायकल चालकावर गुन्हे दाखल करण्यात आले असून सदरच्या मोटरसायकल चालकाकडून रोख स्वरूपात 6400 रुपये दंड वसूल करण्यात आला. वाठार पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईमुळे धूम स्टाईल सुसाट मोटरसायकलीवर चांगला वचक बसणार आहे.