श्री सम्मेद शिखरजी येथे स्वच्छता अभियानस्थैर्य, फलटण: जैन समाजाची काशी श्री सम्मेद शिखरजी पारसनाथ येथे सोलापुर,पुणे ,सातारा,सांगली जिल्हा कार्यक्षेञ असलेल्या सामाजीक क्षेञात नेहमी आघाडीवर असलेल्या श्री सन्मती सेवा दलाच्या सुमारे 250 स्वयंसेवकांनी स्वच्छता अभियान राबवुन स्वच्छतेचा संदेश दिला.

श्री सन्मती सेवा दलाचे संस्थापक अध्यक्ष मिहीर गांधी, विद्यमान अध्यक्ष राजेश शहा, मनीष शहा, प्रशांत दोशी, सहप्रसीध्दी प्रमुख नितेश दोशी व भावी प्रसिद्धी प्रमुख यशराज गांधी व पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली श्री सम्मेद शिखरजी स्वच्छता अभियान राबवुन सुमारे 27 की.मी.चा डोंगर स्वच्छ करण्यात आला.

श्री सन्मती सेवा दलातर्फे मागील 8 वर्षांपासुन प्रतीवर्षी श्री सम्मेद शिखरजी येथे स्वच्छता मोहीम राबवली जाते.

No comments

Powered by Blogger.