आपल्या हक्काचे डिजिटल नेटवर्क

पवारसाहेब, तुम्हीच माढ्यातून लढाखासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांची मागणी

फलटण (प्रसन्न रुद्रभटे): राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सुप्रीमो खासदार शरद पवार यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी अशी आग्रही मागणी विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या आयोजित बैठकीप्रसंगी केली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे माढा लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या आयोजित बैठकीप्रसंगी खासदार शरद पवार यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी अशी मागणी केली. त्यांनी मागणी केल्यावर राष्ट्रवादीच्या इतर पदाधिकार्‍यांनीही शरद पवार यांना आपण लोकसभा निवडणुक लढवावी असे सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत खासदार शरद पवार जे निर्णय घेतात ते सर्वांना मान्य असतात तर राष्ट्रवादीच्या पदधिकार्‍यांची ही मागणी मान्य करावी, अशी मागणी केली असल्याचे खुद्द खासदार शरद पवार यांनीच पत्रकारांशी बोलताना दिली.

निवडणुकीबाबत काल बैठक

मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राज्यातील सर्व लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित केली होती. राज्यातील काही मतदारसंघ वगळता सर्व मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीचे काम व्यवस्थित सुरु आहे असेही खासदार पवार यांनी स्प्ष्ट केले.

भाजपा विरोधातील सर्वांना एकत्र आणण्याचा प्रयत्न

संपूर्ण देशामध्ये महागठबंधंन करणे शक्य नाही म्हणजेच राष्ट्रवादीने तामिळनाडू मध्ये आपले उमेदवार उभे करून काय फायदा? तर महागठबंधंन करताना ते देश पातळीवर न होता राज्य पातळीवर महागठबंधंन करावे अशी मागणी सगळ्याच राज्यातून होत आहे. त्या मुळे महाराष्ट्रासह संपूर्ण देशात आघाडी करताना राज्यावर आघाडी करावी असेही मत खासदार शरद पवार यांनी व्यक्त केली.

आम्ही तुमचे ऐकतो, तुम्हीही आमचे ऐका

पक्षातील सर्व धोरणात्मक निर्णय आम्ही तुमचे ऐकतो तर आपण माढा लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवावी हे आमचे म्हणणे आपण ऐकावे अशी मागणी विजयसिंह मोहिते-पाटील यांच्यासह राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांनी खासदार शरद पवार यांच्याकडे केली.

माढा मतदार संघातून नक्की कोण?

शरद पवार, विजयसिंह मोहिते पाटील, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, प्रभाकर देशमुख नक्की कोण उमेदवार माढा लोकसभा मतदार संघातून निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे लढवणार याकडे संपूर्ण मतदारसंघाचे लक्ष लागून राहिले आहे.