कारंडेवस्ती शाळेच्या बालगोपाळांनी भरवली भाजी मंडई
फलटण: जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कारंडेवस्ती (मलवडी) केंद्र -बिबी या शाळेने विद्यार्थांना दैनंदिन व्यवहारातील ज्ञान घेण्यासाठी स्थानिक परिसरातील स्वतःच्या शेतातील पिकणारा भाजीपाला विक्री करुन प्रत्यक्ष अनुभवातून व्यवहार ज्ञानाचे धडे घेतले. शालेय बाजार पेठेतील स्वच्छ, निवडक भाजीपाल्याच्या खरेदीसाठी पालक, ग्रामस्थ, यांची गर्दी झाली. दोन तासाच्या बाजारपेठेत 5000 रुपयांची उलाढाल झाली. या नावीण्यपूर्ण उपक्रमाबद्दल ग्रामस्थांनी मुलांचे कौतुक केले.
Post a Comment