पुलवामा हल्ल्याच्या निषेधार्थ फलटण हायस्कूलमार्फत निषेध फेरी

स्थैर्य, गोखळी: जम्मू काश्मीर येथील पुलवामा जिल्ह्यात दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या ताफ्यावर केलेल्या भ्याड हल्ल्यामध्ये 42 भारतीय जवान शहीद झाले या कृत्याच्या निषेधार्थ फलटण शहरातील फलटण हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी निषेध फेरी फलटण शहरातील शिंगणापुर रोड,डॉ.आंबेडकर चौक,महावीर स्तंभ,उमाजी नाईक चौक,महात्मा गांधी चौक,महात्मा फुले चौक,डेक्कन चौक, तळ्यातील गणपती मार्गावरील निषेध फेरी काढण्यात आली.

फेरीमध्ये विद्यार्थ्यांनी पाकिस्तान दहशतवाद्यांचा निषेध करणारे फलक हातात घेऊन दहशतवाद्यांच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. ’ वीर जवान तुझे सलाम, ’ शहिद जवान अमर रहे ’,पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देऊन शहरातील मार्गावरील वरील परिसर दणाणून सोडला. विद्यालयामध्ये शहिद जवानांना श्रध्दांजली वाहण्यात आली.

दरम्यान, भारिप बहुजन महासंघामार्फत तहसीलदारांना या घटनेच्या चौकशीबाबतचे निवेदन देण्यात आले. त्याचप्रमाणे निषेध व्यक्त करण्यात आला आहे. यावेळी संघाचे जिल्हा उपाध्यक्ष सुभाष गायकवाड, तालुकाध्यक्ष अरविंद आढाव, शहराध्यक्ष युवराज काकडे, शाहू, फुले, आंबेडकर विद्वत सभेचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक भोसले, तालुका उपाध्यक्ष अमित गायकवाड, युवक अध्यक्ष किशोर मोहिते, गौतम मोहिते, प्रकाश रणदिवे, आनंद आढाव, डी. पी. अहिवळे, अशोक आढाव, सौ. अश्विनी अहिवळे, सौ. चित्रा गायकवाड, विकास मोरे, रमेश निकाळजे, सौ. शारदा बिबवे, संतोष जाधव, मनोहर अहिवळे, विजय कुंभार उपस्थित होते.

No comments

Powered by Blogger.