महात्मा गांधी आणि सातारा;सावंत यांनी दिला आठवणींना उजाळा

सातारा: सातार्‍यात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली शेड्युल कास्ट फेडरेशन पक्षाचे पहिले सातारचे आमदार खंडेराव सावंत यांनी महात्मा गांधी यांचे समोर बसून त्यांचे शिल्प तयार करण्यासाठी 84 सालापूर्वी यशस्वीपणे प्रयत्न केले होते. तसेच पाचगणी येथील एका प्रसंगाच्या आठवणीने पुन्हा या सातारा जिल्ह्यातील दोन घटनेला उजाळा मिळाला आहे

मुबंईतील प्रसिद्ध अशा जे.जे ,संकुल ऑफ आर्ट मध्ये खंडेराव सावंत यांनी डिप्लोमा घेतला . त्यांनतर ते प्रभात स्टुडिओत आर्टिस्ट पदावर काम करू लागले . डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे संपर्कांत आलेवर ते सामाजिक कार्यात भाग घेऊ लागले . खंडेराव सावंत हे ब्रिटीशकालीन मुंबई प्रांतिक काँन्सिलचे सातारा येथून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या बरोबर सदस्यही होते.त्यावेळी मुबंई प्रांताचे तत्कालीन सध्या सातारा येथे स्थायिक झालेले कूपर कंपनीशी संबंधित धनजीशहा कूपर यांनी मुख्यमंत्री पद भूषवले होते.अशी ही माहिती मिळाली आहे.

1935- 1936 साली महात्मा गांधी खूप व्यस्त होते तरीही खंडेराव सावंत यांना त्यांनी वेळ दिला व त्यांचे समोर बसून त्यांचे शिल्प तयार केले होते. तर पाचगणी जि सातारा येथे जुलै 1944 साली गांधीजी यांना मारण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी सेवा दलाचे मणिशंकर पुरोहित, भाऊसाहेब भिलारे, बाबुराव ओंबळे, बापूसाहेब उंबरकर,भिलार गावचे भिकू दाजी भिलारे,डॉ. सावंत व त्यांचे सहकारी यांनी हल्लेखोर असलेल्या नथुराम गोडसे यांना पकडले होते.त्यांच्या हातातील चाकू हिसकावून घेतला होता.गोडसे यांच्या समवेत पुणे येथून पाचगणीला नारायण आपटे, विष्णू करकरे, गोपाळ गोडसे हे आले होते. असे जाणकार मंडळींनी त्यावेळी नमूद केले आहे. याबाबत गांधी यांचे निकटवर्तीय यांनीही पुस्तक प्रकाशित केले आहे . दोन्ही गोष्टी सातारा जिल्हाशी निगडित आहेत.

काल महात्मा गांधी यांना जाऊन सत्तर वर्षे झाली आहेत तरीही अलिगढ येथील हिंदू महासभेच्या काही माथेफिरुनी गांधीजी यांच्या प्रतिमेला खोट्या गोळ्या झाडून आनंद उत्सव साजरा केला. या विकृतीचा सातारा जिल्ह्यातील अनेकांनी निषेध व्यक्त केला आहे. आजही आपल्या कार्याने गांधी विचार जिवंत राहू शकले आहेत ते कधीही नष्ट करता येणार नाहीत. ही गोष्ट सातार्‍यातील दोन प्रसंगाने कायमचे आठवणीत राहणार आहेत अशी प्रतिक्रिया विद्रोही चळवळ संघटनेचे कार्यकर्ते विजय मांडके व खंडेराव सावंत यांचे पुत्र प्रकाश सावंत यांनी व्यक्त केली आहे.

No comments

Powered by Blogger.