Your Own Digital Platform

नाभिक महामंडळाच्या फलटण शहराध्यक्षपदी राउत

स्थैर्य, फलटण: महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या फलटण शहराध्यक्षपदी आनंदराव राउत यांची एकमताने निवड करण्यात आली.

नुकत्याच झालेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली. यावेळी विजय सपकाळ, बापूराव काशीद, शंकरराव मर्दाणे, शंकरराव दळवी, ह. भ. प. विठ्ठलमहाराज गायकवाड, पै. बाळासाहेब काशीद, अंबादास दळवी, अजय काशीद, तुकाराम घाडगे, नंदकुमार काशीद, पै. स्वागत काशीद, संतोष सपकाळ, दत्तात्रय दळवी, संतोष जाधव, शामराव कर्वे, जीवन मसूरकर, सदाशिव सपकाळ, सुरेश पवार, तुषार कर्वे, गणेश काशीद, विकास कर्वे, आनंदराव राउत, महेश पवार, मयुर काशीद, प्रविण कर्वे, तुकाराम काशीद, संजय पवार, पिंटू शिंदे, अविनाश साळुंखे, जयदीप राउत, सचिन यादव, राजेंद्र काशीद, सचिन पवार, सुरज तांदळे, जितेंद्र कर्वे, पप्पू कर्वे, हेमंत कर्वे, भरत पवार, शेखर कर्वे, बापूराव देवकर, राहुल पवार, ऋषीकेश कर्वे, अजय दळवी, मयुर उल्हाळकर, आशिष कर्वे उपस्थित होते.

आनंदराव राउत हे समाजासाठी 25 वर्षे कार्यरत आहेत. समाजातील नागपंचमी, वीज जीवा महाले जयंती, श्री संत सेना महाराज पुण्यतिथी, वीर शिवा काशीद जयंती इत्यादी उत्सव व सामाजीक कार्यासाठी त्यांचे मोलाचे योगदान असते. समाजामध्ये सर्वपरिचित म्हणून त्यांची निवड केली असल्याची चर्चा आहे.