माढ्यातून शरद पवारांचा पराभव करु: ना. पाटील


मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी लोकसभेची निवडणूक लढवणार असल्याचे संकेत दिले आहेत. माढा लोकसभेतून लढण्याबाबत विचार करू, असे शरद पवार म्हणाले. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस लढवत असलेल्या लोकसभा मतदार संघाच्या इच्छुकांची आज पुण्यातल्या बारामती हॉस्टेलमध्ये बैठक झाली, दरम्यान शरद पवार बोलत होते.

दरम्यान, शरद पवार यांचे वय पाहता त्यांनी या वयात लोकसभेची निवडणूक लढू नये, माढा मतदारसंघात भाजप त्यांचा नक्कीच पराभव करेल, असा इशारा भाजपाचे ज्येष्ठ नेते व महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज दिला.

तसेच भाजपने माढा मतदारसंघात संघटना मजबूत केली असून शरद पवार यांच्यासाठी बारामती हा सेफ मतदारसंघ आहे त्यांनी तेथून निवडणूक लढवावी ते निवडून येतील, असे पाटील म्हणाले.

1 comment:

  1. मोहिते पाटिल साहेब शरद पवार साहेबा ऐवजी श्रीमंत संजिव राजे नाईक निबांळकर का नको हे कळेल का,? असे तर नाही ना मला नाही तर कोणाला नाही असे तर नाही ना ।।।

    ReplyDelete

Powered by Blogger.