Your Own Digital Platform

विद्यापीठ परीक्षेत मायणीच्या आयुर्वेद महाविद्यालयाची उत्तुंग कामगिरी

मायणी : आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक अंतर्गत डिसेंबर 2018 मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये मायणी ता. खटाव येथील आयुर्वेद महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उत्तुंग कामगिरी केली आहे. 2005 साली स्थापन झालेल्या या महाविद्यालयाने आपल्या निकालाची परंपरा कायम ठेवली आहे .

या विद्यालयाचे बी. ए. एम. एस. परीक्षेतील गुणवत्ताप्राप्त विद्यार्थी द्वितीय वर्ष बी ए एम एस परीक्षेचा निकाल 92 टक्के लागला असून प्रथम तीन गुणवत्ताप्राप्त विद्यार्थी खालीलप्रमाणे प्रथम - तळले नेहा सुनील 70.95 द्वितीय चव्हाण ईश्वरी सतीश 70.28 कदम सीमा बाळाजी 69.80 तृतीय वर्ष बी. ए. एम. एस. 94 पहिले तीन क्रमांक मोमीन रुकसार नाझिर59.56, द्वितीय हाके हर्षदा विजय 59.30, तृतीय पाटील श्रुती ज्योतीराम 58.86 चतुर्थ वर्ष बी. ए. एम. एस .निकाल 90 प्रथम कुलकर्णी ऐश्वर्या विकास 72.36, द्वितीय वाईकर श्रद्धा चंद्रकांत 70.81 तृतीय गावडे शिवानी दादासो 69.90.

सर्व यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. एम. आर. देशमुख, सचिव चंद्रकांत देशमुख, प्राचार्य आरबुने व संस्थेच्या सर्व संचालक यांनी अभिनंदन केले.