Your Own Digital Platform

ग्रामपंचायतीत दुरंगी, तिरंगी, चौरंगी लढत; विठ्ठलवाडी बिनविरोधफलटण, : फलटण तालुक्यात 13 ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणूक कार्यक्रम सध्या सुरु असून उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी बुधवार दि. 13 रोजी विठ्ठलवाडी (तरडगाव) येथील ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध पार पडली आहे. उर्वरित ग्रामपंचायत सरपंच पदाच्या 12 जागांसाठी 30 उमेदवार निवडणूक आखाड्यात उतरले असून ढवळेवाडी (आसू), गोखळी, दालवडी, मिरेवाडी, खडकी, माळेवाडी आणि टाकोबाईचीवाडी येथे सरपंचपदासाठी प्रत्येकी 2 उमेदवार निवडणूक आखाडयात असून तेथे थेट सरपंच पदाची निवडणूक सरळ लढतीने होणार आहे तर तरडगाव येेथे थेट सरपंचपदाच्या 1 जागेसाठी 4 उमेदवार निवडणूक आखाड्यात उतरले असून तेथे चौरंगी सामना रंगणार आहे. मिरगाव, सासवड, शिंदेमाळ आणि चांभारवाडी येथे थेट सरपंचपदासाठी तिरंगी सामना रंगणार आहे. तरडगाव येथील सरपंचपदासाठी चौरंगी सामना होत असून सुनिता अंकुश खुडे, लता दामोदर गायकवाड, जयश्री अनिल चव्हाण, निर्मला विकास चव्हाण हे सरपंचपदाचे 4 दावेदार आहेत. प्रभाग क्र 1 व 2 मधील प्रत्येकी 3 जागांसाठी प्रत्येकी 7 उमेदवार, प्रभाग क्र 3, 4 व 5 मधील प्रत्येकी 3 जागांसाठी प्रत्येकी 6 उमेदवार अशा एकुण 15 जागांसाठी 32 उमेदवार निवडणूक आखाड्यात उतरले आहेत निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून बी.टी. भांगे काम पहात आहे.

ढवळेवाडी (आसू) येथे सरपंचपदासाठी अश्विनी कैलास चव्हाण आणि कल्पना ज्ञानेश्वर चव्हाण यांच्यात सरळ सामना होणार आहे. सदस्यपदाच्या 7 जागांसाठी 14 उमेदवार निवडणूक आखाड्यात उतरले आहेत. जे.ए.शिंदे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पहात आहेत.

गोखळी येथे थेट सरपंचपदासाठी निलम मयुर गावडे आणि सुमन हरिभाऊ गावडे यांच्यात सरळ सोमना होत असून सदस्यपदाच्या 11 जागांसाठी 23 उमेदवार निवडणूक आखाड्यात उतरले आहेत निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एम.ए.देवकाते काम पहात आहेत.

दालवडी येथे थेट सरपंचपदासाठी मधुकर आबु शिंदे आणि सतीश दत्तात्रय शिंदे यांच्यात सरळ सामना होत असून सदस्यपदाच्या 7 जागांसाठी 14 उमेदवार निवडणूक आखाड्यात उतरले आहेत पी.एन.जाधव निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पहात आहेत.

मिरगाव येथे सरपंचपदासाठी तिरंगी सामना होत असून शिवाजी भगवान करे, गौतम विश्वास मोहिते, महादेव शंकर मोहिते हे थेट सरपंचपदाचे 3 उमेदवार आहेत. सदस्यपदाच्या 9 जागांसाठी 18 उमेदवार निवडणूक आखाड्यात उतरले आहेत. के.बी. उदमले निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पहात आहेत.

सासवड येथे थेट सरपंचपदासाठी तिरंगी सामना होत असून नंदकुमार गोविंद काकडे, राजेंद्र जानराव काकडे, राजेंद्र गुलाब काकडे हे 3 उमेदवार निवडणूक आखाड्यात उतरले आहेत. तर सदस्यपदाच्या 11 जागांसाठी 22 उमेदवार निवडणूक आखाड्यात उतरले आहेत. एस.व्ही. रणसिंग निवडणूक निर्णय अधिअकारी म्ह्णुन काम पहात आहेत.

शिंदेमाळ येथे थेट सरपंचपदासाठी तिरंगी सामना होत असून आशा बाळू शिंदे, रुक्मिणी विजय शिंदे, सुजाता राजेंद्र शिंदे हे तीन उमेदवार निवडणूक आखाड्यात उतरले आहेत. सद्स्यपदाच्या 7 जागांसाठी 14 उमेदवार निवडणूक आखाड्यात उतरले आहेत. एम.एम. चौधरी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पहात आहेत.

टाकोबाईचीवाडी थेट सरपंचपदासाठी कृष्णाथ संजय झणझणे आणि दत्तात्रय भाऊसाहेब शिंदे यांच्यात सरळ सामना होणार असून सदस्यपदाच्या 7 जागांसाठी 14 उमेदवार निवडणूक आखाड्यात उतरले आहेत. बी.एस.जाधव निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पहात आहेत.

चांभारवाडी येथे थेट सरपंचपदासाठी तिरंगी सामना होत असून धनेश बापू बागडे, सोमनाथ मोहन बागडे, हरिदास कुंडलीक बागडे हे 3 उमेदवार निवडणूक आखाड्यात उतरले आहेत. प्रभाग क्रमांक 1 मधील 2, प्रभाग क्र 2 मधील 1 आणि 3 मधील 1 अशा 4 जागांची निवड बिनविरोध झाली असून उर्वरित 3 जागांसाठी 6 उमेदवार निवडणूक आखाड्यात राहिले आहेत. बी.एस.जाधव निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पहात आहेत.

माळेवाडी (तरडगाव) येथे थेट सरपंचपदासाठी आनंदा पांडुरंग अडसुळ व विठ्ठल गणपत अडसुळ यांच्यात सरळ सामना होत आहे. सदस्यपदाच्या 7 पैकी 3 जागा बिनविरोध झाल्या असून उर्वरित 4 जागांसाठी 8 उमेदवार निवडणूक आखाड्यात राहिले आहेत. एम.एम. चौधरी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पहात आहेत.

खडकी येथे थेट सरपंचपदासाठी कल्पना लालासाहेब कोकरे आणि सारिका प्रकाश सूळ यांच्यात सरळ सामना होत असून सदस्यपदाच्या 2 जागा बिनविरोध झाल्या असून उर्वरित 5 जागांसाठी 10 उमेदवार निवडणूक आखाड्यात राहिले आहेत. के.बी. उदमले निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पहात आहेत.

मिरेवाडी येथे थेट सरपंचपदासाठी शोभा शांताराम चव्हाण आणि संजीवनी संतोष मुळीक यांच्यात सरळ सामना होत असून सदस्यपदाच्या 7 जागांपैकी नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी राखीव 2 जागेवर उमेदवारी अर्ज दाखल झाले नाहीत तर उर्वरित 5 जागा बिनविरोध झाल्या आहेत.

मतदान व मतमोजणी

फलटण तालुक्यात 13 पैकी विठ्ठलवाडी (तरडगाव) या एका ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध पार पडली आहे. उर्वरित 12 ग्रामपंचायतीसाठी रविवार दि. 24 फेब्रुवारी रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत त्या त्या गावात निर्धारित केलेल्या मतदान केंद्रावर मतदान घेण्यात येणार आहे.

सोमवार दि. 25 रोजी सर्व 12 ग्रामपंचायत थेट सरपंच व सदस्यपदासाठी झालेल्या मतदानाची मोजणी फलटण येथे करण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक अव्वल कारकुन प्रकाश नाळे यांनी दिली आहे.