तिरकवाडी ग्रामस्थांचा उपोषणाचा इशारा

फलटण : संपूर्ण तालुका दुष्काळाने होरपळत असताना तिरकवाडी ता.फलटण येथील पाझर तलावातून रात्रंदिवस पाणी शेतीला उपसले जात असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली असून संबंधित लोकांवर कारवाई करण्याची मागणी जिल्हाधिकारी यांचेकडे केली असून या बाबतीत ग्रामसभेत ही ठराव केला असून या बाबत तहसीलदार विजय पाटील यांनी या ठिकाणी असणारी विजेची कनेक्शन तोडण्याचा आदेश महावितरणला दिले होते मात्र तीच कनेक्शन पुन्हा जोडल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला असून या अन्यायाविरोधात उपोषणाला बसण्याचा इशारा तिरकवाडी ग्रामस्थांनी दिला आहे.

पाझर तलाव हा पाणी साठवून आसपासच्या विहिरी बोअरवेल तसेच इतर पाणी स्त्रोत साठी पाझर व्हावा या साठी असतो तसा सुप्रीम कोर्टाने सुद्धा निकाल दिला आहे मात्र या निकालाची पायमल्ली करून वयक्तिक लाभासाठी या भागात 1/2 गुंठे जमीन विकून इथे काही लोकांनी विहिरी खोदल्या आहेत या मधून राजरोस पणे मोठमोठ्या मोटारी लावून पाणी उचलले जात असल्याने जनावरांना ही भविष्यात या पाझर तलावात पाणी राहील की नाही अशी शंका आली असून ग्रामस्थांनी तक्रारी केल्यावर व ग्रामसभेत ठराव केल्यानंतर या भागातील विहिरीवरील वीज कनेक्शन तोडली होती मात्र परत ही वीज कनेक्शन तहसीलदार विजय पाटील यांनी बंद केली होती मात्र त्यांनी च परत लगेच जोडण्यास परवानगी दिल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली असून या बाबत प्रांत संतोष जाधव यांनी लक्ष घालून ही वीज कनेक्शन ताबडतोब कायमस्वरूपी बंद करावीत अशी मागणी केली आहे. ती बंद न केल्यास ग्रामस्थांनी उपोषणाचा इशारा दिला आहे.

या बाबतीत तक्रारी देऊनही तसेच ग्रामसभेत ठराव देऊनही या कडे या कडे तहसीलदार व लघु पाटबंधारे विभाग यांनी दुर्लक्ष केल्याने दुष्काळाने होरपळत असलेल्या जनतेला न्याय देऊन वीज कनेक्शन ताबडतोब तोडून त्या लोकांवर फौजदारी खटले दाखल करण्याची मागणी ग्रामपंचायत सदस्य शिरीष सोनवलकर यांनी केली आहे.

No comments

Powered by Blogger.