शानभाग विद्यालयात जीवनरक्षा प्रणालीची प्रात्यक्षिके व व्याख्यान
साताराः येथील केएसडी शानभाग विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या कलावाणिज्य व विज्ञान विभागासाठी जीवनरक्षा प्रणाली याविषयावर प्रात्यक्षिकासह व्याख्यान संपन्न झाले.

सातारा येथील सुप्रसिध्द भूलतज्ञ डॉ. वैशाली विनय मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम संपन्न झाला. जनजागृती आणि जीवनसंजीवनी या माध्यमातून सर्व समाजातील नागरिकांना आपत्कालीन प्रसंगी एखाद्याचे जीवन वाचविण्यासाठी कोणते उपाय योजावेत यासंदर्भात वैद्यकीय आणि विना वैद्यकीय प्रात्यक्षिकांचे यावेळी सादरीकरण करून माहिती देण्यात आली.

कार्यक्रमासाठी डॉ.हर्षद पाटील व डॉ.शशी यशवंत पाटील यांनीही विशेष सहकार्य केले. एक तासाहून अधिक काळ चाललेल्या या व्याख्यानात बुडणार्या जीवाचे प्राण कसे वाचवावे त्याला श्‍वाच्छोश्छवासाठी कशाप्रकारे मदत करावी आदी संदर्भात यावेळी आणलेल्या कृत्रिम रबरी पुतळयावर प्रयोग दाखवण्यात आले.

डॉ. मोरे यांनी अशाप्रकारे सुमारे 200 हून अधिक व्याख्याने व डेमो प्रात्यक्षिके आजपर्यंत सादर केली आहेत. सातारा जिल्हा भूलतज्ञ संघटनेच्या त्या सन 2015-16 सालासाठी सचिव म्हणून कार्यरत होत्या. तसेच त्यांना भूलतज्ञ संघटनेकडून राष्ट्रीय स्तरावरील पारितोषिक या उपक्रमांतर्गत मिळाले आहे.

याप्रसंगी डॉ. मोरे यांचा शाळेच्या वतीने संचालिका सौ.आंचल घोरपडे यांनी श्री सरस्वतीची प्रतिमा भेट देवून सत्कार केला. याप्रसंगी स्लाईड शो द्वारेही उदबोधनपर मार्गदर्शन करण्यात आले तसेच उपस्त्ति मुलामुलींनी विचारलेल्या शंका व प्रश्‍नाचे निरसन डॉ. मोरे यांनी केले.

No comments

Powered by Blogger.