हरणाईचा डंका पोहचला रशियात

हरणाई सूतगिरणीस सदिच्छा भेटीप्रसंगी रशियाचे विद्यार्थी व शिक्षकांच्या सोबत रणजितसिंह देशमुक, विक्रमादित्य देशमुख व इतर. 

वडूज:
दुष्काळी खटाव तालुक्यातील औद्योगिक क्रांतीचे प्रतीक ठरलेले हरणाई सह. सूतगिरणीची भुरळ सातासमुद्रापार असलेल्या रशिया देशातील विद्यार्थ्यांना पडल्याने त्यांची पावले आपसूकच या महत्वाकांक्षी असलेल्या हरणाई सूतगिरणीकडे वळली.
येळीव ता. खटाव येथील हरणाई सह. सूतगिरणीस रशिया देशातील विद्यार्थी व शिक्षक यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी हरणाई सुतगिरिणीचे संस्थापक अध्यक्ष रणजितसिंह देशमुख, जनरल मॅनेजर रमेश भोसले, विक्रमादित्य देशमुख, पृथ्वीराज गोडसे, प्रोडक्शन मॅनेजर अमृत मट्टीकली आदींची प्रमुख उपस्थिती होती.
महाराष्ट्रीयन पाहुणचारांमध्ये बावीस रशियन पाहुण्यांचे औक्षण करून गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. प्रवेशद्वाराजवळ दोन्ही देशाचे झेंडे व रशियन अद्याक्षराने रांगोळी काढून केलेल्या स्वागताने सर्व जण भारावून गेले. ज्या हेतूने परदेशी पाहुण्यांचे आगमन झाले तो क्षण हरणाई सूतगिरणीच्या कार्यकर्तृत्वाचा अनमोल ठेवाच ठरला. याप्रसंगी पाहुण्यांनी केलेले कौतुकाचा क्षण सुतगिरिणीच्या कर्मचार्‍यांना अभिमानास्पद वाटला. तदनंतर महाराष्ट्रीयन मानाचे फेटे बांधल्याने विद्यार्थी पाहुणे भारावून गेले. स्वागत, मनोगतानंतर पिठल-भाकरी खाऊन जेवणाचा मनमुराद आनंद लुटला. हरणाईची भूरळ रशियन पाहुण्यांनाही पडल्याचे दिसून आले. सरतेशेवटी हरणाई सूतगिरणीच्या प्रांगणात मनमुराद हिंदी व मराठी गाण्यांवर रशियन नृत्य ठेका धरून उपस्थितीची वाहवा मिळवली. तर भारतीय व त्यातल्या त्यात महाराष्ट्रीयन आदरातिथ्य पाहून पुन्हा परत येण्याची कबुली देत हे रशियन पाहुणे रवाना झाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कंपनीचे सीए ए. टी. श्रीनिवासन यांनी केले तर आभार राणाप्रताप देशमुख यांनी मानले. यावेळी गजानन शिंदे, सत्यवान कांबळे, प्रवीण जाधव, हणमंत भोसले, नामदेव घाडगे उपस्थित होते.

No comments

Powered by Blogger.