महाबळेश्‍वरमध्ये थंडीचा कडाका; अनेक ठिकाणी बर्फवृष्टी

सातारा: महाराष्ट्राचे काश्मीर महाबळेश्‍वर मध्ये आज प्रचंड थंडीचा कडका अनुभवायला मिळाला. प्रचंड थंडीमुळे वेण्णा तलाव ते लिंगमाळा परिसरात सुमारे 0 ते काही भागात उणे 2 ईतके निच्यानंकी तापमान पहावयास मिळाले. दरम्यान वेण्णा तलाव परिसरात अधिकृत तापमान दाखविणारी यंत्रणा पालिकेने वा हवामान खात्याने बसवावी अशी मागणी आजच्या कडाक्याच्या थंडीमूळे व तयार झालेल्या मोठ्या प्रमाणातील हिमकणांमुळे पुन्हा जोर धरू लागली आहे.

या हंगामात आज दवबिंदू गोठून हिमकण पहावयास मिळण्याची हि चौथी वेळ आहे .पैकी आजच्या येथील थंडीचा कडका या हंगामातील सर्वात जास्त म्हणावा लागेल .कारण आज वेण्णा लेक ते लिंगमाळा परिसरात काही ठिकाणी 0 अंश तर काही भागात उणे 2 ईतके निच्यानंकी तापमान पहावयास मिळाले .काल सकाळ पासूनच या नंदनवनातील थंडीचा जोर वाढत होता .रात्री तर तो आणखीनच वाढला. आज भल्या पाहाटे वेण्णा तलाव व परिसराने तर या हंगामातील सर्वात जास्त थंडीचा अनुभव घेतला .आजच्या थंडीमुळे वेण्णा तलाव ते लिंगमाळा परिसरात ठीक ठिकाणी दवबिंदू गोठून हिमकण मोठ्या प्रमाणात तयार झाल्याचे पहावयास मिळाले तर याच परिसरात स्टोबेरीसह फळ - पालेभाज्या सह झाडे झुडपे ,वेली यांनी हिमकणाची शाल पांघरल्यामुळे त्याची मौज निसर्गप्रेमींना मुक्तपणे लुटता आली.

या हंगामातील आजची हि सर्वात जास्त थंडी असल्याने येथील वेण्णा तलावावरील दोन्ही जे टी वर हिमकणां ची पंढरी दुलाई दिसत होती या व्यतिरिक्त पालिकेने बोटिंग करताना पर्यटकांसाठी सुरक्षा रक्षक कोट परिधान करण्यासाठी जे जे टी वर ठेवले होते ते हि हिमकणा मुळे पांढरे झाले होते या व्यतिरिक्त याच परिसरातील वाहनाचे टप, स्मृतीवनातील वेली, रानफुले, झाडेझुडुपे, गवताचे पठार सर्वांनीच हिमकणाची चादर पांघरल्याने ते पांढरे शुभ्र झाल्याचे पहावयास मिळत होते तर स्टोबेरी च्या बागा मधील लाल चुटूकदार स्टोबेरी ची मधुर फळे हिम कणांच्या गुलदस्त्यात सुखावल्याचे मनोहारी दृश्य पहावयास मिळत होते .

दरम्यान आजच्या थंडीचे खास वैशिष्ठ म्हणजे आज थंडीचा जोर एवढा जास्त होता कि लिंगमाळा परिसरात काही भागात किमान तापमान उणे 2 पर्यंत गेले होते त्यामुळे अनेक फळबागा व शेतात बादल्या ,बकेट ,टप यामध्ये रात्री झाडांना घालून राहिलेल्या पाण्याचा वरचा थर गोठून तो काचेसारखा पारदर्शक झाला होता तर काही ठीकाणी बादलीतील पाण्याचे बर्फ तयार झाल्याचे दिसत होते .या शिवाय विविध फुलांच्या नर्सरीमधील फुला झाडांनाही आजच्या थंडीचा फटका बसला .या नर्सरी मधील झेंडूच्या फुलांनी आपला शेंदरी रंग हरवून बसल्या सारखे भासत होते तर गुलाबाचे फुल हि यात मागे नव्हते .तेही हिमकणांचे दागिने घालून नटून बसल्यासारखे सुखद चित्र पहावायास मिळाले .स्टोबेरी ची फळे व रोपे सुद्धा हिमाकाणांची शाल पांघरून बसल्यचे जाणवत होते .

आजच्या कडाक्याच्या थंडीमुळे वेण्णा तलाव ते लिंगमाळा परिसरातील शेतकर्‍यांचे तसेच स्टोबेरी सारख्या नाजूक फळांचे ,त्याच्या रोपांचे तसेच विविध नर्सरी मधील फुल झाडांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले .बरीचशी रोपे कडक्यामुळे जाळून गेल्याने त्याभागातील नेहमी अंडी दिसणारा मळेधारक शेतकरी चिंताग्रस्त व हवालदिल झाल्याचे गंभीर चित्र दिसत होते
No comments

Powered by Blogger.