कराड तालुक्यात पाच ग्रामपंचायती साठी आज मतदानकराड: कराड तालुक्यात राजकीय दृष्ट्या महत्त्वपूर्ण असलेल्या मसूरसह इतर चार गावातील ग्रामपंचायतींसाठी आज दिनांक.24 रोजी मतदान होत असून. मतदान प्रक्रियेसाठी यंत्रणा सज्ज झाली आहे. तालुक्यातील यादववाडी गावच्या एका जागेसाठी मतदान होणार आहे.
कराड तालुक्यातील मसूर ,राजमाची, माळवाडी, वाण्याचीवाडी, वडोली भिकेश्वर, यादववाडी कचरेवाडी, आदि गावांसाठी ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला होता. पैकी कचरेवाडी बिनविरोध झाल्याने या गावची निवडणूक घेण्यात आली नाही. यादववाडी येथे एका जागेसाठी निवडणूक होत असून इतर जागा बिनविरोध झाल्या आहेत. यावेळी निवडणूकीत सरपंच थेट जनतेतून निवडला जाणार असल्याने मोठी चुरस निर्माण झाली आहे. बहुतांश ठिकाणी दुरंगी लढत होत असून सरपंच पदासाठी काही ठिकाणी बहुरंगी लढत होत आहे. मसूर ग्रामपंचायती सर्वात मोठी ग्रामपंचायत असून याठिकाणी 17 सदस्य व एक सरपंच अशा जागांसाठी मतदान होणार आहे. सतरा सदस्यांसाठी 37 उमेदवार रिंगणात आहेत. दोन पॅनलचे 34 व तीन अपक्ष उमेदवार असे एकूण 37 उमेदवार रिंगणात आहेत. तर सरपंच पदाचे एका जागेसाठी दोन पॅनलचे दोन व 4अपक्ष असे एकूण सहा उमेदवार रिंगणात आहेत. प्रचारात आरोप-प्रत्यारोपांनी दोन्ही बाजूकडून तोंडसुख घेण्यात आल्याने. यावेळी निवडणुकीत मोठी चुरस पाहायला मिळत आहे.

No comments

Powered by Blogger.