माढा लोकसभा निवडणूक लढवणार ः काशिनाथ सोनवलकर

दुधेबावी ः आगामी लोकसभा निवडणूक आपण माढा मतदार संघातून लढवणार असल्याचे धनगर समाजाचे नेते व समाजसेवक काशिनाथ सोनवलकर यांनी दैनिक स्थैर्यच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले.

धनगर समाजाला आरक्षण मिळत नसल्याने आपण नाराज असून भाजपने पहिल्या कँबिनेटमध्ये आरक्षण देतो असे सांगून आज पाच वर्षे पूर्ण होत आली तरीही आरक्षण दिले नाही व आघाडी सरकारने (काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस)आजपर्यंत समाजाची मते घेतली परंतु आरक्षण दिले नाही. या दोन्ही सरकारने धनगर समाजाला आरक्षण दिले नाही. तसेच आजपर्यंत लोकसभा निवडणुकीतही उमेदवारी दिली नाही.

सध्याच्या संभाव्य यादीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने समाजातील नेत्यांना एकाही जागेवर घेतल्याचे दिसत नसल्याने आपण ही निवडणूक लढवणार असल्याचे काशिनाथ सोनवलकर यांनी सांगितले.

आरक्षणा संदर्भात आपण याअगोदर वेळोवेळी पाठपुरावा केला असून त्याचे पुरावे आपल्या जवळ आहेत. तसेच समाजातील गरीब लोकांना न्याय मिळवून दिला आहे. प्रमुख राजकीय पक्ष धनगर समाजाला लोकसभा व विधान सभेला उमेदवारी देण्यास तयार नाहीत. त्यामुळे भाजप व काँग्रेस सरकारने धनगर समाजाला लोकसभा निवडणुकीत धडा शिकवण्यासाठी आपण माढा लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर समितीचे अध्यक्ष व महाराष्ट्र राज्य धनगर समाज उन्नती मंडळाचे सरचिटणीस काशिनाथ सोनवलकर यांनी सांगितले.

No comments

Powered by Blogger.