फेसबुकवरचा मेसेजही डिलीट करता येणार

नवी दिल्ली:
व्हॉट्सअ‍ॅपवरून पाठवलेला मेसेज डिलिट करण्याच्या नव्या फीचर पर्यायाला युजर्सनी खूप पसंती दर्शवली आहे. व्हॉट्सअ‍ॅपसारखाच हा पर्याय फेसबुकमध्येही दिसणार आहे. फेसबुकच्या मेसेंजरवरून पाठवलेला मेसेज 10 मिनिटात डिलिट करण्याची सुविधा फेसबुकने ग्राहकांना दिली आहे. त्यामुळे अनावश्यक पाठवलेला मेसेज डिलीट करता येवू शकणार आहे.

फेसबुकच्या मेसेंजरवरून पाठवलेला मेसेज डिलिट करता येत नाही. याआधी व्हॉट्सअ‍ॅपवरही असेच होत होते. परंतु, व्हॉट्सअ‍ॅपने यात बदल केला असून तासाभरात मेसेज डिलिट करण्याची सुविधा युजर्संना दिली आहे. त्यामुळे अनावश्यक वा चुकून पाठवलेला मेसेज तासाभरात डिलिट करता येतो. फेसबुकवरील अनावश्यक मेसेज डिलिट करता यावेत यासाठी फेसबुकने नवीन फीचर आणले आहे. मेसेज डिलिट करण्यासाठी रिमुव्ह फॉर एव्हरीवन आणि रिमुव्ह फॉर यू अशा दोन पर्यायाचा यात समावेश करण्यात आला आहे.

एका युजरने याचा स्क्रीनशॉट रेडिटवर शेअर केला आहे. व्हॉट्सअ‍ॅपवर एका तासात मेसेज डिलिट करण्याची सुविधा आहे. तर फेसबुकवर 10 मिनिटांच्या आत पाठवलेला मेसेज डिलीट करता येणार आहे. फेसबुकने आपल्या मेसेंजर अ‍ॅपमध्ये नवीन फीचर्स अ‍ॅड करण्याचे ठरवले आहे.

No comments

Powered by Blogger.