Your Own Digital Platform

पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्याच

स्थैर्य, फलटण : जम्मू- काश्मीरमधील पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्याचा निषेध संपूर्ण देशातून होत आहे. पाकिस्तानी सैन्य आणि आयएसआयला चोख प्रत्युत्तर द्याच, अशी मागणी सध्या सोशल मिडिया होत आहे.

पुलवामा येथे जैश- ए- मोहम्मदच्या दहशतवाद्याने घडवलेल्या आत्मघाती स्फोटात 39 जवान शहीद झाले. या हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. देशासह जगातून या हल्ल्याचा कठोर शब्दात निषेध केला आहे. आता शांततेसाठी पाकिस्तानसोबत चर्चा करण्याचे दिवस संपले. आता पाकिस्तानला धडा शिकवण्याची वेळ आली आहे. केंद्र सरकारलाही याची जाणीव असेल, अशी आशा आहे. आता खूप झाले, आपल्या जवानांनी दिलेले बलिदान व्यर्थ जाऊ नये, अश्या आशयाचे बरेच मेसेजच सध्या सोशल मिडीयावर फिरत आहेत.

पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल बाजवा आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना देखील खडेबोल सुनावले जात आहेत. पाकिस्तानी सैन्य आणि आयएसआय या गुप्तचर यंत्रणेने काश्मीर आणि पंजाबमधील फुटिरतावाद्यांना पाठबळ देणे थांबवावे, असेही म्हटले जात आहे. आमच्याकडे 81 हजार जवानांची सुसज्ज फौज आहे. आता पाक सैन्य व गुप्तचर यंत्रणेने पंजाबमध्ये दहशतवादी कारवाया करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही त्यांना चोख प्रत्युत्तर देऊ. हे 1980 चे दशक नाही. पंजाब पोलिसांकडे अत्याधुनिक शस्त्र आहेत. इम्रान खान यांना आयएसआयना पंतप्रधानपदी बसवले असून ते आयएसआयसाठीच काम करत आहेत.

गुरुवारी हल्ल्यानंतर पंजाब विधानसभेत हल्ल्याचा निषेध करणारा ठराव देखील मंजूर करण्यात आला. एकीकडे शांततेसाठी चर्चा करायची आणि दुसरीकडे दहशतवादी संघटनांच्या मदतीने देशात कारवाया करायच्या, हा पाकिस्तानचा दुटप्पीपणा यातून उघड झाला आहे.