स्वामी समर्थांची पालखी सोमवारी फलटणमध्ये

फलटण : श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ, अक्कलकोट यांच्यावतीने निघालेल्या श्री स्वामी समर्थ पालखी परिक्रमेचे सोमवार, दिनांक 4 फेब्रुवारी रोजी फलटण शहरात आगमन होणार आहे. सायंकाळी 5 वाजता महतपुरा पेठ (मलटण) येथील श्री स्वामी समर्थ मंदिरात पालखी सोहळ्याचे स्वागत होणार आहे. त्यानंतर हरिबुवा महाराज मंदीर, पाचबत्ती चौक, सिमेंट रोड, बारामती चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक, उमाजी नाईक चौक, गजानन चौक, शंकर मार्केट मार्गे अहिल्यादेवी नगर (गजानन चौक) येथील श्री स्वामी समर्थ मंदिरात पालखी सोहळ्याचा मुक्काम राहणार आहे.

तरी भाविकांनी या पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी सायंकाळी 5 वाजता महतपुरा पेठ येथील स्वामी समर्थ मंदिरात उपस्थित राहून शहर परिक्रमेमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन श्री स्वामी समर्थ सेवा मंडळ, फलटणचे अध्यक्ष संजय चोरमले यांनी केले आहे.

No comments

Powered by Blogger.