Your Own Digital Platform

नाना पाटील चौकात एस.टी.तून धूर
फलटण-सातारा गाडीचे वायरिंग जळाले; नागरिकांच्या प्रसंगावधानानेे दुर्घटना टळली
स्थैर्य, फलटण :  फलटणहू न सातार्‍याकडे निघालेल्या फलटण आगाराच्या एस.टी.बसचे वायरिंग जळाल्यानेे प्रवाशांच्यात एकच खळबळ उडाली. चौकातील रिक्षाचालक व नागरिकांनी चालू बसमधून येणारा धूर पाहून प्रसंगावधान दाखवत तात्काळ बस थांबवल्याने मोठा अनर्थ टळला.
सकाळी 11.30 ची फलटण - सातारा  (टपाल गाडी ) प्रवासी व विद्यार्थ्यांनी खचाखच भरून आगारातुन सातारकडे मार्गस्थ झाल्यावर  नाना  पाटील  चौकातून  जात असता चौकात  असणार्‍या  रिक्षाचालकांना व नागरिकांना  एस. टी. च्या  डाव्या  बाजुच्या  चाकाच्या शेजारी  धुर व जाळ दिसताच आरडाओरडा  करून  ही बाब  चालकाच्या  लक्षात  आणुन  दिली. चालक बुधावले यांनी प्रसंगावधान राखत बस जाग्यावर थांबवली व प्रवासी  व विद्यार्थ्यांना सुखरूप बाहेर  काढले. तोपर्यंत  नागरिकांनी  व रिक्षाचालकांनी पाणी  आणून  लागलेली  आग  आटोक्यात  आणली. तोपर्यंत  नाना  पाटील  चौकात  वाहनांच्या  रांगा लागल्या  होत्या  ही एस टी बस नंतर  नागरिकांच्या  मदतीने चौकातून  ढकलत  बाजूला  नेण्यात आली. फलटण आगार प्रमुखांनी  गाड्या सोडताना त्या  नादुरुस्त नसल्याची खात्री करुनच सोडाव्यात अशी मागणी  प्रवासी  वर्गातून होत आहे.