विठ्ठलवाडी ग्रामपंचायत बिनविरोध; सरपंचही बिनविरोधच

तरडगाव: विठ्ठलवाडी (तरडगाव) ता. फलटण येथील ग्रामपंचायत पंचावार्षिक निवडणूक बिनविरोध पार पडली असून प्रथमच थेट मतदारांमधून सरपंच निवडून देण्याची पध्दत यावेळी स्विकारण्यात आली आहे. मात्र विठ्ठलवाडी ग्रामस्थांनी सरपंच आणि सर्व 7 सदस्य बिनविरोध निवडून देवून एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. त्याबद्दल विठ्ठलवाडी ग्रामस्थांचे विविध स्तरावरुन अभिनंदन होत आहे.

सर्वसाधारण स्त्री उमेदवारासाठी सरपंचपद राखीव असून या पदावर शितल प्रितम कोरडे यांची बिनविरोध निवड झाली आहे तर उर्वरित 7 ग्रामपंचायत सदस्य म्हणून वैशाली अंकुश गायकवाड, भरत तुकाराम बोडके, माणिक बंडू कोरडे, जयश्री जोतीराम शिंदे, मंगल सुभाष कोरडे, मयुरी प्रविण कोरडे आणि सचिन सोपान शिंदे यांची बिनविरोध निवड झाली आहे.

उमेदवारी अर्ज दाखल करताना वरीलप्रमाणे सरपंचपदासाठी 1 आणि सदस्य पदासाठी 7 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आल्याने सदरची निवडणूक बिनविरोध पार पडल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी बी.एस.बोडरे यांनी जाहीर केले आहे.

No comments

Powered by Blogger.