सीआरपीएफच्या जवानाला बारामती पोलिसांची बेदम मारहाण

बारामती: श्रद्धांजली सभेची परवानगी मागण्यासाठी दुचाकीवर ट्रिपल सीट आल्याचे कारण देत बारामती पोलिसांनी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) एका जवानाला बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. अशोक इंगवले असं या जवानाचं नाव असून तो सीआरपीएफच्या 118 बटालियनचा आहे.

अशोक इंगवले हा सोनगाव येथील राहणारा आहे. आज सकाळी श्रद्धांजली सभेसाठी परवानगी मागण्यासाठी तो तालुक्याच्या पोलीस ठाण्यात गेला होता. त्यावेळी दुचाकीवर ट्रिपल सीट आल्याचा व दारू प्यायल्याचा आरोप करून पोलिसांनी त्याला तब्बल सात तास पोलीस ठाण्यात बसवून ठेवले. दारू प्यायल्याचा आरोप जवानानं फेटाळला. ’माझी वैद्यकीय तपासणी करा. त्यातून सत्य समोर येईल’, असं त्यानं पोलिसांना सांगितलं. मात्र, पोलिसांनी त्याचं ऐकून घेतलं नाही. उलट 16 पोलिसांनी मिळून त्याला मारहाण केली.

जम्मू-काश्मीरमध्ये सीआरपीएफच्या जवानांवर झालेल्या हल्ल्याचा देशभरात निषेध होत असतानाच हा प्रकार समोर आला आहे. यामुळं पोलिसांच्या वर्तणुकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे.

No comments

Powered by Blogger.