रोहित पवार माढ्याचे स्टार प्रचारक होणार? युवकांमध्ये रोहित पवारांची क्रेझ
स्थैर्य, फलटण: पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य व युवा नेते रोहित राजेंद्र पवार हे खासदार शरद पवार यांचा प्रचार करण्यासाठी माढ्यात येणार?, रोहित पवार माढ्याचे स्टार प्रचारक होणार? असे अनेक प्रश्न सध्या फलटणसह माढा मतदारसंघातील युवकांसमोर आहेत. रोहित पवार यांनी सक्रीय राजकारणात प्रवेश केल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला आहे. राज्यातील युवकांमध्ये रोहित पवारांची खूप मोठी क्रेझ आहे.

पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून रोहित पवार यांनी सक्रीय राजकारणात प्रवेश केला. राज्यात शरद पवारांबरोबर अनेक कार्यक्रमांना त्यांनी उपस्थिती लावली आहे. खासदार शरद पवार यांचा प्रचार करण्यासाठी माढा लोकसभा मतदारसंघामध्ये येणार? असा सवाल सध्या युवकांना पडला आहे. शरद पवार यांचा वारसा रोहित पवार हे पुढे चालवत असल्याची चर्चा संपूर्ण राज्यात सुरु आहे. तसेच या बाबत वेगवेगळे तर्क वितरक लावले जात आहेत.

रोहित पवार यांनी अल्पावधीत आपला वेगळा ठसा राजकारणात उमटवला आहे. रोहित पवार यांनी सृजन संस्थेद्वारे अनेक विधायक उपक्रम त्यांनी राज्यात राबविले आहेत. त्यांची राज्यात वेगळी क्रेझ निर्माण केली आहे.

No comments

Powered by Blogger.