लोकसभा निवडणुकीची शासकीय तयारी सुरु
विभागीय आयुक्तांनी घेतला निवडणूक पूर्व आढावा

सातारा : प्रत्येक मतदान बुथवर रॅम्प असणे आवश्यक आहे, जे थोडेफार रॅम्प तयार करणे राहिले आहेत ते तत्काळ करुन घ्या तसेच मतदारांसाठी मतदान बुथवर ज्या 8 सुविधा पुरवावयाच्या आहेत, त्या आठही सुविधांचे काटेकोर नियोजन करा, अशा सूचना विभागीय आयुक्त दिपक म्हैसेकर यांनी दिल्या.

काल 6 फेब्रुवारी 2019 रोजी सार्वत्रिक लोकसभा निवडणूक-2019 च्या पुवर्तयारीबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात विभागीय आयुक्त दिपक म्हैसेकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. यावेळी ते बोलत होते. या बैठकीला जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल, अपर जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी सचिन बारवकर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी पुनम मेहता यांच्यासह सर्व प्रांताधिकारी, तहसीलदार उपस्थित होते.

आयुक्तांनी केली प्रत्यक्ष मतदान केंद्राची पहाणी

सातारा-262 शाहुपुरी ग्रामपंचायतीच्या हद्दीतील शानबाग हायस्कूलमधील 246 ते 249 तसेच 257- कोरेगाव मतदार संघातील खेड ता. सातारा येथील जिल्हा परिषदेत शाळेतील मतदान केंद्राची प्रत्यक्ष पाहणी करुन दिव्यांग मतदारांबाबत असणार्‍या सोयी-सुविधा यांची पहाणी करुन आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याचे निर्देश यावेळी आयुक्तांनी जिल्हा प्रशासनाला दिले. एकूण मतदार, त्यापैकी चिन्हांकित मतदार, दिव्यांग मतदार, मतदारांचे, निवडणूक कामाजासाठी पोलींग पर्सनल, दिव्यांग मतदारांसाठी सोयी-सुविधा याबाबतच्या आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देशही यावेळी आयुक्तांनी जिल्हा प्रशासनाला दिले.

निवडणूक कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी ज्या-ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या कराव्यात. विधानसभा मतदार संघनिहाय अधिकारी, कर्मचारी यांच्या निवडणूक संदर्भातील कामाची ड्युटीज योग्य त्या पद्धतीने लावाव्यात. एकमेकांमध्ये उत्तम समन्वयांसाठी सर्व दळण-वळण यंत्रणा अद्यावत ठेवाव्यात. त्यात सर्व दूरध्वनी लाईन्स, इंटरनेट सुविधा, वाहनांची उपलब्धता याबाबींचे अत्यंत काळजीपूर्वक नियोजन करावे. निवडणुकीच्या संदर्भात कोणतीहीबाब असेल त्यात आचारसंहितेचा भंगापासून कोणताही गुन्हा तत्पर नोंदविा जावून त्यावर अतिशय कमी वेळात कारवाई करावी, अशा सूचनाही विभागीय आयुक्त दिपक म्हैसेकर यांनी शेवटी केल्या.

No comments

Powered by Blogger.