गुलाबराव गुंजवटे यांचे निधन
गोखळी : झिरपवाडी (ता.फलटण )येथील गुलाबराव सिताराम गुंजवटे(86) यांचे वृध्दाकालाने शुक्रवारी सायंकाळी पांच वाजता निधन झाले.
ते श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे सेवानिवृत कर्मचारी होते. पश्चात पत्नी पांच विवाहित मुलगे, भाऊ,भावजय नातवंड असा परिवार आहे. तरडगांव ता.फलटण येथील मंडल कृषी अधिकारी सोमनाथ गुंजवटे यांचे वडील होत.
राहत्या घरापासून निघालेल्या अंत्ययात्रेमध्ये सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, कृषी क्षेत्रातील व नातेवाईक सहभागी झाले होते.
Post a Comment