Your Own Digital Platform

राजुरी गावचा विकासाचा डोंगर असाच वाढत जावो : श्रीमंत संजीवराजे

राजुरी: राजुरी गावातील सर्व नेते व युवक एकत्र येऊन विकास कामांचा डोंगर उभा करत आहेत ही बाब कौतुकास्पद आहे. राजुरी च्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध असून आणखी विकासाची घोडदौड सुरु ठेवून विकासाचा डोंगर असाच वाढत जावो, अशी अपेक्षा सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी केली.

राजुरी ग्रामपंचायतीच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व उदघाटन समारंभ व महाआरोग्य शिबीर शुभारंभ प्रसंगी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर बोलत होते.

यावेळी आ. दिपक चव्हाण, फलटण पंचायत समितीच्या सभापती सौ. प्रतिभा धुमाळ, श्रीराम साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. बाळासाहेब शेंडे, मा. जिल्हा परिषद अध्यक्ष माणिकराव सोनवलकर, जि. प. सदस्या सौ. भावनाताई सोनवलकर, फलटण तालुका दूध संघाचे चेअरमन धनंजय पवार, व्हा चेअरमन महादेव चव्हाण, पंचायत समिती सदस्य नानासाहेब लंगुटे, सचिन रणवरे, भैरवनाथ सोसायटीचे चेअरमन डॉ. बाळासाहेब सांगळे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष जयकुमार इंगळे, मार्केट कमिटीचे संचालक विनायक पाटील, खरेदी विक्री संघाचे संचालक आण्णासाहेब जाधव, जेष्ठ नेते बजरंग खटके, गुणवरे सोसायटीचे चेअरमन शिवाजीराव लंगुटे, जिल्हा सहकार बोर्डाचे संचालक सोमनाथ गावडे, युवा नेते योगीराज साळुंखे, भैरवनाथ यात्रा कमिटीचे सदस्य कांतीलाल खुरंगे, राजुरी सोसायटीचे चेअरमन महादेव गावडे, मा. सरपंच डॉ. मधुकर माळवे, भास्करराव घोलप, पोपट हगारे, राजुरी गावच्या सरपंच सौ. कौशल्या साळुंखे, उपसरपंच पै. भारत गावडे व सदस्य यांच्या सह मान्यवर मंडळी उपस्थित होती.

राजुरी गावातील सर्व नेते व युवक एकत्र येऊन विकास कामांचा डोंगर उभा करत आहेत ही बाब कौतुकास्पद आहे. राजुरी च्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध असून आणखी विकासाची घोडदौड चालू ठेवली जाईल. आज या ठिकाणी आदर्श पॅरामेडिकल कॉलेज पुणे यांच्या वतीने महाआरोग्य शिबीर आयोजित करून ग्रामीणभागातील शेतकर्‍यांच्या व महिलांनाच्या आजार तपासणी व उपचारासाठी ही एक पर्वणीच या परिसरातील लोकांना उपलब्ध झाली आहे असे श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी सांगितले.

यावेळी राजुरी ग्रामपंचायतीच्या सुमारे 8 कोटी 32 लाख 25 हजार रुपये च्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व उदघाटन मान्यवर मंडळींच्याहस्ते करण्यात आले. यावेळी राजुरी व परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येनेे उपस्थित होते.