Your Own Digital Platform

गावडे कुटुंबीयांनी लावलेल्या रोपट्याचा वटवृक्ष होईल ः सोनवलकरब्लूम स्कूल मध्ये वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात

दुधेबावी
: गावडे कुटुंबीयांनी लावलेल्या रोपट्याचे वटवृक्षात रुपांतर होईल असे गौरवोद्गार सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्माणिकराव सोनवलकर यांनी काढले. गुणवरे, तालुका फलटण, जिल्हा सातारा येथील ब्लूम इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज या प्रशालेच्या वार्षिक स्नेहसंमेलन व बक्षीस वितरण समारंभाच्या अध्यक्षस्थानी ते बोलत होते.

याप्रसंगी पुणे येथे कार्यरत असलेले लोकल क्राईम ब्रांचचे सीनिअर पोलिस इन्स्पेक्टर श्री दयानंद गावडे, , सातारा जिल्हा परिषदेच्या सदस्य उषादेवी गावडे, शिवाजीराव गावडे माजी जिल्हा परिषद सदस्य सातारा, फलटण पंचायत समितीचे सदस्य संजय कापसे, ज्येष्ठ पत्रकार अरविंद मेहता, रमेश आढाव, ईश्वर कृपा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री ईश्वर गावडे , सेक्रेटरी सौ साधनाताई गावडे, पुणे प्रादेशिक विभागाचे वाहन निरीक्षक श्री संभाजी गावडे, गुणवरे च्या सरपंच प्रवीणा गावडे, दौंड पंचायत समितीचे सदस्य पोपटराव खोमणे तसेच सिकंदर आढाव,यशवंत खलाटे, दीपक मदने विविध गावातील सरपंच उपसरपंच तसेच पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ते पुढे म्हणाले की, शाळेने दर्जेदार शिक्षण, विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्राधान्य देणारे उपक्रम, खेळाची सुविधा, संगणक कक्ष, डिजीटल क्लासरुम, लायब्ररी अशा विविध सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे फलटण तालुक्यातील पालक या शाळेकडे आकर्षित झाले आहेत. शिक्षणाबरोबर खेळाला प्राधान्य दिल्याने विद्यार्थी आरोग्यसंपन्न व भावनिक दृष्ट्या तयार होतील. श्री अरविंद मेहता व दयानंद गावडे यांनी शाळेने राबवलेल्या उपक्रमामुळे शाळेतील विद्यार्थी पुढे जाऊन नक्कीच मोठे अधिकारी बनतील व गावाचे तालुक्याचे नाव मोठे करतील असा विश्वास संपादन केला.

शाळेचे प्राचार्य श्री शेखर गायकवाड यांनी प्रास्ताविकात शाळेने उपलब्ध करून दिलेल्या सोयी सुविधा तसेच राबवलेले विविध उपक्रम व कार्यक्रम यांची माहिती दिली.

नुकत्याच झालेल्या क्रीडा स्पर्धा व इतर स्पर्धा मधील विशेष प्राविण्य मिळवलेल्या सुमारे 53 विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रमाणपत्र व स्मृतीचिन्हाचे वाटप करण्यात आले. यानंतर झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सादर केलेल्या गणपतीच्या गीताने प्रेक्षकांची मने जिंकली. पुढे मराठी, हिंदी, इंग्रजी, कोकणी, तमिळ भाषेतील गाण्यावर विद्यार्थ्यांनी सुंदर नृत्य केली तर शेतकरी आत्महत्या या विषयावर इयत्ता पहिली ते पाचवी च्या विद्यार्थ्यांनी सुंदर थीम सादर केली. कार्यक्रमाची सुरुवात नुकत्याच झालेल्या पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहून करण्यात आली तर सुमारे 19 प्रकारांच्या गीतांचा शेवट देशभक्तीपर गीताने व वंदेमातरमने करण्यात आला.

स्नेहसंमेलन यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षकांनी प्रयत्न केले. सूत्रसंचालन श्री नवनाथ कोलवडकर यांनी केले तर आभार श्री रमेश सस्ते यांनी मानले.