Your Own Digital Platform

फलटणकरांच्या अर्थिक उन्नतीत ‘गॅलक्सी’ हातभार लावेल: खक्कर

गॅलक्सी को.ऑप. सोसायटीचे फीत कापून उद्घाटन करताना खक्कर शेजारी सचिन यादव व मान्यवर

फलटण: गॅलक्सी को. ऑप सोसायटीचे अवघ्या एका आठवड्यात सुमारे साडेतीन हजार शेअर्स विकले गेले आहेत. या संस्थेच्या माध्यमातून फक्त शेतकर्यांच्याच नव्हे तर कामगारांच्या व व्यापार्यांच्या अर्थिक उन्नतीत आमच्या संस्थेचा हातभार लागेल, असे प्रतिपादन के. बी. एक्सपोर्ट प्रा. लि.,चे सीईओ कौशल खक्कर यांनी केले.

गॅलक्सी को. ऑप. सोसायटीच्या नामजोशी पेट्रोल पंपासमोरील मुख्य कार्यालयाचा शुभारंभ खक्कर यांच्या हस्ते झाला. त्यावेळी खक्कर बोलत होते.

यावेळी चेअरमन सचिन यादव, व्हाईस चेअरमन योगेश रघुनाथ यादव, संचलक संदीप शिंदे, गणेश निकम, संजय ढेंबरे, सौ. मंजुश्री खलाटे, सौ. सविता चोपडे, सौ. करिष्मा सावंत, सौ. राजश्री लोंढे, अजित साळुंखे, संजय बोराटे, सौ. प्रिया मोहिते, सौ. प्रणिता खलाटे, सौ. सुनंदा यादव, सौ. प्रतिक्षा लोंढे, अ‍ॅड. शिवप्रसाद लोंढे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.

खक्कर म्हणाले, के. बी. एक्सपोर्ट कंपनी तालुक्यातील शेतकर्यांचा शेतमाला परदेशात निर्यात करत आहे. शेतमालाला चांगला भाव मिळत असल्यामुळे शेतकर्यांना अर्थिक उन्नतीचा नवा मार्ग सापडला आहे. त्याचधर्तीवर येथील व्यापारी वर्गाला व कर्मचारी वर्गाच्या अर्थिक उन्नतीसाठी गॅलक्सी को. ऑप. क्रेडिट सोसायटी काम करेल, असा विश्‍वास खक्कर यांनी व्यक्त केला.

सचिन यादव म्हणाले, कोणताही व्यवसाय करताना किंवा आपले जीवन जगत असताना अर्थिक भांडवल हा महत्वाचा भाग असतो. फलटण तालुक्यातील नोकर वर्गाला व व्यापारी वर्गाला आपली अर्थिक अडचण सोडवण्यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्नशील राहू. ज्याप्रमाणे शेतकरी वर्गाची अर्थिक अडचण दूर करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. त्याचप्रमाणे व्यापारी व नोकर वर्गाचीही अडचण आम्ही दूर करु. दि. 1 फेब्रुवारी रोजी आम्ही गॅलक्सी को. ऑप. सोसायटीची स्थापना केली. गत एक आठवड्यातच या संस्थेचे सुमारे साडेतीन हजार शेअर्स विकले गेले आहेत. जनतेचा प्रतिसाद पाहता आगामी काळात गॅलक्सी को. ऑप. सोसायटी प्रगतीचे शिखर निश्‍चितच पादाक्रांत करेल, यात शंका नाही. या संस्थेच्या माध्यमातून रोजगार निर्मिती हा मुख्य हेतू नसून सामाजिक बांधिलकी जपण्यासाठीही आम्ही कटीबद्ध राहणार आहोत, असेही यादव यांनी आवर्जून सांगितले.

दरम्यान, योगेश यादव यांनी मनोगत व्यक्त केले.

लक्ष्मण पाटील यांनी सुत्रसंचालन केले.

कार्यक्रमास के. बी. एक्सपोर्टचे सर्व कर्मचारी, अधिकारी व सेवकांची तसेच मान्यवरांची उपस्थिती होती.