पुण्यतिथीदिवशीच इच्छा केली पूर्ण

स्थैर्य, विडणी: आमदार दीपक चव्हाण यांच्या हस्ते रकमेचे वितरण करण्यात आले.

साठवलेली पुंजी नातवंडासाठी

विडणी: आजीच्या अंतिम इच्छेनुसार पुण्यतिथी दिवशी मुलांनी 40 नातवंडाना आजीने साठविलेली रक्कम आमदार दिपकराव चव्हाण यांच्या हस्ते वाटप करणेत आले.

विडणी ता. फलटण येथील श्रीमती नर्मदाबाई गणपतराव शेंडे याचे वयाच्या 95 वर्षी निधन झाले त्यांना सहा मुले दोन मुली यांच्यासह 40 नातवंडे असा मोठा परिवार त्याची मुलासह सूना नातवंडे वर खूप माया,प्रेम होते.त्यांनी मुलांना आपल्या निधना नंतर आपण जमा करुन ठेवलेली रक्कम आपल्या लाडक्या नातवंडाना वाटून टाकावी अशी इच्छा व्यक्त केली होती .

श्रीमती नर्मदाबाई याची प्रथम पुण्यतिथी त्यांच्या मुलांनी खूप मोठी साजरी केली यावेळी ह.भ.प.शिवदत्त महाराज कलांडे यांचा किर्तनाच कार्यक्रम ठेवला होता.या पुण्यतिथीला आमदार दिपकराव चव्हाण,जेष्ठ नेते सुभाषराव शिदे श्रीराम साखर कारखान्याचे चेअरमन डॉ.बाळासाहेब शेंडे ,संचालक जगन्नाथ बुवा नाळे,मा.संचालक सर्जेराव नाळे,माधवराव अभंग ,अशोक काका पवार नितीनजी शेंडे आदी मान्यवरांसह तालुक्यातील राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील अनेकांनी उपस्थित राहून आदरांजली वाहिली,

याच वेळी शेंडे कुंटुबियानी आपल्या आई श्रीमती नर्मदाबाई यांच्या अंतिम इच्छा उपस्थित समोर जाहीर केल्याने मुले,मुली, सूना नातवंडे,आश्‍चर्याचा धक्का दिला.उपस्थित सर्वजण श्रीमती नर्मदाबाई यांचे असणारे शेंडे कुटुंबावर असणारे प्रेमाने अनेकांना गहिवरुन आले.

श्रीमती नर्मदाबाईनी यांनी वयाच्या 95 वर्षा पर्यत कुटुंब एकसंघ राखून मुले मुली सूना नातवंडे यांच्या सोबत राहून जाताना देखील समाजाला कुटुंब एकसंघ ठेवण्याचा चांगला विचार देऊन गेल्या.

No comments

Powered by Blogger.