Your Own Digital Platform

कृष्णकांत शंकरराव कुदळे यांचे निधन

पुणे: जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते कृष्णकांत शंकरराव कुदळे यांचे दीर्घ आजाराने निधन झाले . ते 75 वर्षाचे होते . त्यांच्यामागे पत्नी , एक मुलगा , सून , एक मुलगी , जावई , दोन भाऊ , तीन बहिणी असा परिवार आहे . ते पुणे फेस्टिव्हल मुख्य संयोजक , अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे कार्याध्यक्ष , महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष , दि सासवड माळी शुगर फॅक्टरीचे चेअरमन , महाराष्ट्र माळी महासंघाचे अध्यक्ष , अखिल भारतीय माळी शिक्षण संस्थेवर अध्यक्ष ,डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष , कृष्णकांत कुदळे पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष , नर्गिस दत्त नागरी पतसंस्थेचे संस्थापक , जे . एस. क्लबचे संस्थापक अशा विविध संस्थांवर त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटविला . त्यांनी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी काम केले . ओ बी सी मंडल आयोगासाठी प्रयत्न त्यांनी केला .महात्मा फुले वाड्याचे राष्ट्रीय स्मारक करण्यामध्ये ते अग्रस्थानी होते . पुणे विद्यापीठाचे नामविस्तार करून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ करण्यामध्ये महत्वाचा वाटा होता .

जंगली महाराज रोडवरील हॉटेल पथिक हे सांस्कृतिक , सामाजिकी चळवळीचे केंद्र होते . सकाळी त्यांच्या जंगली महाराज रोडवरील निवासस्थानी त्यांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी नागरिकांनी गर्दी झाली होती . दुपारी चार वाजता वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले .

त्यांच्या निवासस्थानी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे अध्यक्ष , महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ , खासदार सुप्रिया सुळे , पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट , महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय राज्य मंत्री दिलीप कांबळे , खासदार अनिल शिरोळे आदीनी श्रध्दांजली वाहिली . तसेच माजी केंद्रीय मंत्री शरद पवार , सुशीलकुमार शिंदे यांनी शोकसंदेश पाठवून श्रध्दांजली वाहिली .

यावेळी माजी आमदार उल्हास पवार , माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर , काँग्रेसचे शहर अध्यक्ष रमेश बागवे , राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अंकुश काकडे ,माजी आमदार कमल ढोलेपाटील , दीप्ती चौधरी , ऍड. जयदेव गायकवाड , डॉ.सतीश देसाई , समता परिषदेचे कार्य्रकर्ते बापूसाहेब भुजबळ , रवी चौधरी , डॉ. कैलास कमोद , दशरथ फुले , अंबादास गारुडकर , डॉ दत्तात्रय बाळसराफ , प्रितेश गवळी , शिवराम जांभुळकर , पंढरीनाथ बनकर , आबा भोंगळे , दीपक कुदळे , राजाभाऊ रायकर , मधुकर राऊत ,डॉ. प्रल्हाद वडगावकर ,माजी महापौर राजलक्ष्मी भोसले, नगरसेविका वैशाली बनकर , नगरसेवक अविनाश बागवे ,विशाल धनकवडे , माजी नगरसेवक विरेंद्र किराड , अभय छाजेड , सदानंद शेट्टी , सुनिल बनकर , संदीप लडकत , मनोहर नांदे व मोठ्या संख्येने समता परिषदेचे पदाधिकारी ,कार्यकर्ते , माळी समाज बांधव उपस्थित होते .