श्रीमती नर्मदा केंजळे यांचे निधन


गोखळी: सोनवडी बुद्रुक ता.फलटण  येथील श्रीमती नर्मदा मल्हारी केंजळे (86)  यांचे रविवारी राञी अल्पशा आजारामुळे निधन झाले.
माळीण मावशी या टोपण नावाने त्यांना ओळखले जायचे. त्यांच्या पश्‍चात चार विवाहित मुलगे,चार विवाहित मुली आहेत.सातारा जिल्हा माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर सेवकांची पतसंस्थाचे संचालक रामदास  केंजळे यांच्या मातोश्रीं होत. स्वतः निरक्षर असुनही चार मुलगे, पाच मुलींना उच्च शिक्षित केले. तीन मुले शिक्षक,एक मुलगा नगरपालिकामध्ये तर मुलींना सुध्दा मुलांच्या बरोबरीने शिक्षण दिले एक मुलगी शिक्षिका आहे, एक बॅकेच्या नोकरी करून सेवानिवृत झाली आहे. नातवंडेही उच्च शिक्षित असुन सध्या जर्मन, अमेरिका येथे उच्च पदावर कार्यरत आहेत. सा राहत्या घरापासून निघालेल्या अंत्ययात्रेमध्ये सामाजिक शैक्षणिक राजकीय क्षेत्रातील लोक सहभागी झाले होते. सोनवडी बुद्रुक येथील स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले.

No comments

Powered by Blogger.