व्ही.एन. एस. निर्माणमुळे शेतकर्‍यांसाठी छोटी सिटी होईल निर्माण: खा. पवार

शेतकरी मेळाव्याप्रसंगी मार्गदर्शन करताना खासदार शरद पवार (छाया: योगेश निकाळजे, विडणी) 

तावरे सिटीचे माळेगावमध्ये भुमीपूजन; शेतकरी मेळाव्याचेही आयोजन

फलटण
: पुण्याच्या आसपास बर्‍याच गृहनिर्माण सिटी उभ्या राहिल्या आहेत. परंतु माळेगावसारख्या ग्रामीण भागात अशा पद्धतीची गृहरचना निर्माण होणे ही बाब कौतुकास्पद आहे. व्ही.एन.एस. निर्माण ग्रुपचा तावरे सिटी हा प्रकल्प म्हणजे माळेगावच्या वैभवात भर टाकणारा आहे. माळेगाव सारख्या ठिकाणी अशी छोटी सिटी तयार होत आहे याचा फायदा नक्कीच शेतकर्‍यांच्या मुलांना होईल असेही खासदार पवार यांनी स्पष्ट केले.

व्ही. एन. एस. निर्माणच्या माळेगाव ता. बारामती येथील तावरे सिटी या प्रकल्पाचे भुमीपूजन खासदार शरद पवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी संसदरत्न पुरस्कार प्राप्त खासदार सौ.सुप्रियाताई सुळे, सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्‍वासराव देवकाते, बारामतीच्या नगराध्यक्षा सौ. पौर्णिमा तावरे, सिने अभिनेते शंतनू मोघे, सिनेअभिनेत्री सौ.पल्लवी वैद्य व इतर मान्यवर उपस्थित होते.

माळेगाव माझ्या पाठीशी ठामपणे उभे
मी पहिल्यांदा विधानसभा निवडणुकीत उभा राहिलो होतो त्या वेळी हेच माळेगाव माझ्या पाठीशी ठामपणे उभे होते. त्या वेळी गाव लहान होतं. माळेगाव येथील कारखान्यामुळे या गावामध्ये खूप बदल झाले, असे खासदार शरद पवार यांनी स्पष्ट केले.

देशातील पाहिले हवामान संशोधन केंद्र माळेगावात
लवकरच आपल्या माळेगावमध्ये आपल्या देशातील पाहिले हवामान संशोधन केंद्र म्हणजेच हवामान संशोधनाचे एक विद्यापीठच उभे राहील, असा विश्‍वास खासदार शरद पवार यांनी व्यक्त केला. येणार्‍या काही महिन्यामध्ये आपल्या देशातील सरकार बदलेल व त्या मुले या हवामान केंद्रासह इतर रखडलेल्या कामांना गती मिळेल, असेही पवार यांनी स्पष्ट केले.

शेतकर्‍यांना मदत देण्याऐवजी हमीभाव द्या
शरद पवार म्हणाले, देशात 82 % शेतकरी हे 2 हेक्टर पेक्षा कमी शेती असलेले आहेत. येणार्‍या काळात काही नवीन प्रयोग आपल्या देशात करणे गरजेचे आहे. शेतकर्‍यांच्या डोक्यावरचं ओझं कमी करण्यासाठी मी केंद्रीय कृषी मंत्री असताना लगेच निर्णय घराला व त्या वेळच्या पंतप्रधान मनमोहन सिग यांनीही लगेच मंजुरी दिली. त्या मुले त्या वेळी शेतकर्‍यांच्या डोक्यावरील ओझे कमी झाले होते. येणार्‍या काळात कर्जमाफी किंवा इतर काही मदत करण्याऐवजी शेतीमालाला हमीभाव द्या. सरकारने जी मदत केली आहे त्याने एका कुटुंबाचा एकवेळचे चहा हि हीनार नाही. 6 हजार रुपये वर्षाला म्हणजेच एका दिवसाचे 17 रुपये होत आहेत त्या मुले हि मदत वैगरे करण्याऐवजी शेतीमालाला हमीभाव द्यावा अशी मागणी खासदार शरद पवार यांनी केली.

लोकसभा व विधानसभेतही महिलांना आरक्षण
सौ. सुप्रिया सुळे म्हणाल्या, माझा पत्ता संसदेत बारामती मधील आमराई येथील आहे परंतु गेली 10 ते 15 वर्ष माझा पत्ता बदलला असून तो आता माळेगाव झाला आहे. आज परिवर्तन यात्रेच्या ठीक ठिकाणी सभा होत्या परंतु माळेगावातील कर्यक्रम म्हणजे माझ्या घरातील कार्यक्रम असल्याने मला इथे उपस्थित राहणेच माझ्यासाठी महत्वाचे असल्याने मी येथे आले असल्याचे त्यांनी सांगीतले. माळेगाव व परिसरातील मंडळींनी शिक्षणाला कायम महत्व दिले आहे. त्यातल्यात्यात मुलीच्या शिक्षणाला माळेगाव व परिसरातील मंडळींनी जास्त भर दिला आहे. संपूर्ण देशात सर्वात जास्त इंजिनिअरिंग मुली या आपल्या माळेगाव व पणदरे या भागातील आहेत. आताचे सरकार हे अतिशय फसवे आहे. येणार्‍या काळात हे सरकार उलथवून लावून गल्ली पासून दिल्ली पर्यंत राष्ट्रवादीची सत्ता आणावी. आम्ही लगेच लोकसभा व विधानसभेमध्ये महिलासाठी आरक्षण लागू करू. या व्ही.एन.एस. निर्माण ग्रुपच्या तावरे सिटी या प्रकल्पामुळे नक्कीच माळेगावच्या वैभवात भर पडणार आहे, असे खासदार सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले.

श्रीमंत संजीवराजे म्हणाले, शेतकरी मेळावाच्या उद्घाटनामुळे शरद पवार साहेबांचे मार्गदर्शन फक्त आपल्याला नाही तर संपूर्ण देशाला लाभणार आहे. आपल्या सर्वांची शेती हीच मूळ पार्श्‍वभूमी आहे. मी स्वतः फलटण मधील एका आजारी कारखान्याचा चेअरमन म्हणून काम करत होतो. आमच्या कारखान्याला आजरातून बाहेर काढण्याचे काम आदरणीय पवार साहेबानी केलं आहे. शरद पवार साहेब व ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्यामुळे आमच्या तालुक्याच्या दुष्काळी भागात पाणी पोहचलं आहे. फलटणला के. बी. म्हणून कंपनी आहे ती कंपनी भेंडी व अन्य उत्पादने एक्स्पोर्ट करते. त्यांना एक्स्पोर्ट करताना शासकीय कामामध्ये बर्‍याच अडचणी येत होत्या. के. बी. मधील काही मंडळी पवार साहेबांना सातारा येथे एका संध्याकाळी भेटली तर दुसर्‍या दिवशी सकाळी शासकीय कामातील सर्व अडचणी पवार साहेबानी सोडवल्या व त्यांना लागणार्‍या सगळ्या परवानग्या त्यांनी उपलध करून दिल्या. आपण आजवर अनेक कार्यक्रम केले आहेत. पण वास्तुनिर्मितीच्या ठिकाणी शेतकरी मेळावा असा पहिलाच कार्यक्रम असल्याचे सांगून श्रीमंत संजीवराजे म्हणाले, आता माळेगाव आणि बारामतीमध्ये फार फरक राहिला नाही. बारामतीचा जो विकास नियोजन बद्ध केला आहे त्याचा आदर्श आज संपूर्ण देश घेत आहे. बारामती आणि शेती हे आता समीकरणच बनले आहे. आशिया खंडातील ड्रीप सिस्टीम स्व.अप्पासाहेब पवार यांनी सर्व प्रथम सुरु केली असल्याची आठवण श्रीमंत संजीवराजे यांनी करुन दिली. सर्वांना मदत करण्याचा पवार साहेबांचा स्वभाव आहे. स्वच्छ सर्वेक्षण (ग्रामीण) मध्ये जो पुरस्कार मला व आमच्या टीमला मिळाला तो पुरस्कार खरं तर मला पवार साहेबांच्या हस्तेच स्वीकारायचा होता, असेही त्यांनी सांगीतले.

यावेळी आयोजित करण्यात आलेल्या शेतकरी मेळाव्यासाठी बारामती, फलटण व इतर तालुक्यातून हजारोंच्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

प्रास्ताविक ऍड.तावरे यांनी केले. घनश्याम दरोडे यांनी आभार मानले.

No comments

Powered by Blogger.