Your Own Digital Platform

मिरढेत गायींची चोरी

जावली : मिरढे ता फलटण गावातील दोन गायींची अज्ञाताने चोरी केली आहे रात्रीची चोरी केल्याने खळबळ उडाली आहे.

अनिल जयसिंग यादव यांच्या मालकीची गावाच्या पश्चीमेला शेतात बांधलेल्या दोन गायी सुमारे साठ हजार रूपये किंमतीच्या अज्ञाताने रात्रीच्या वेळी चोरून नेल्याने शेतकरी अडचणीत आला आहे विकतचा चारा घेवुन दुग्धव्यवसाय करीत असताना अगोदरच घायकुतीला आलेला शेतकरी कसेतरी दुधउत्पादन घेवून गुजराण करीत असताना चोरट्यांनी गायींचीच चोरी केल्याने दुधउत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे

बरड येथे इंजीन चोरी नंतर शेजारच्याच मिरढे गावातील दोन गायी चोरीला गेल्या आहेत याबाबत बरड पोलीस ठाण्याचे कर्मचार्‍यांनी घटनास्थळी येवून पंचनामा केला .