पोलीस यंत्रणा महिलांच्या संरक्षणासाठी सज्ज: नांगरे-पाटील

फीत कापून उद्घाटन करताना विश्‍वास नांगरे-पाटील

सातारा: सातारा शहरात जिल्हयाच्या कानाकोपर्‍यातून विद्यार्थिनी शिक्षणासाठी येथे येतात. त्यांना छेडछाडीच्या प्रसंगांना सामोरे जावे लागते. युवतींनी भयमुक्त वातावरणात शिक्षण घ्यावे याकरिता अस्तित्वात आलेली निर्भया पोलीस चौकी लोकांच्या सेवेत रुजू होत आहे. महिलांच्या छेडछाडीचे कोणतेही प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. सडकसख्याहारींचा योग्य तो बंदोबस्त केला जाईल. पोलीस यंत्रणा ही सतत महिलांच्या संरक्षणासाठी सज्ज आहे असे प्रतिपादन कोल्हापूर परिक्षेत्राचे महानिरीक्षक विश्‍वास नांगरे पाटील यांनी केले.

कॅम्प सदरबझार परिसरातील वायसी कॉलेज ते आझाद कॉलेजच्या सर्व कॅम्पसवर तीस कॅमेर्‍यातून नजर ठेवणार्‍या निर्भया पोलीस चौकीचे विश्‍वास नांगरे पाटील यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अतिरिक्त पोलीस अधीक्षक धीरज पाटील यावेळी उपस्थित होते.

सातार्‍याचा कॅम्पस आता शंभर टक्के छेडछाड मुक्त होणार. युवतींनी निर्भयपणे शिक्षण घ्यावे असे आवाहन नांगरे पाटील यांनी केले. या पोलीस चौकीला दोन स्वतंत्र पथके तैनात करण्यात आली आहेत. हा कॉलेज कॅम्पस परिसर संपूर्णपणे तीस सीसीटीव्ही कॅमेर्‍याने आरक्षित करण्यात आला आहे.

येथील यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सच्या ऑडिटोरियममध्ये नांगरे पाटील यांनी विद्यार्थ्याशी संवाद साधला. नांगरे पाटलांचे भाषणं ऐकण्यासाठी सगळा कॅम्पस गर्दीने भरून गेला होता .

No comments

Powered by Blogger.