Your Own Digital Platform

बाला रफिक यांनी मारले फलटणचे मैदान
फलटण : फलटणचे युवराज श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कुस्ती मैदानात यंदाचा महाराष्ट्र केसरी पै.बाला रफिक विरुध्द हरियाणा केसरी पै.सुमित कुमार यांची कुस्ती आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली, यामध्ये पै.बाला रफिक यांनी बाजी मारुन मानाची गदा व रक्कम रु.1 लाखाचे रोख बक्षिस मिळविले.

या कुस्ती स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा नुकताच महाराष्ट्र राज्य विधानपरिषदेचे सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते झाला. यावेळी आमदार दीपक चव्हाण, सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे संयोजन फलटण पंचायत समितीचे माजी सभापती दत्तात्रय गुंजवटे व त्यांच्या सहकार्‍यांनी केले.