आगवणे यांचा राजीनामा लवकरच भूमिका जाहीर करणार : आगवणे

स्थैर्य, फलटण : स्वराज संघटनेचे जिल्हा अध्यक्ष दिगंबर आगवणे यांनी आपल्या पदाचा व राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आहे. आगामी काळात तालुक्यातील कार्यकर्त्याशी बोलून आपली भूमिका जाहीर करणार असल्याचे आगवणे यांनी जाहीर केले.

गत काही महिन्यांपूर्वी श्रीमंत रामराजे व पोलीस प्रशासनाच्या विरुद्ध उपोषणास बसलो होतो त्या वेळी तालुक्यातील जे कार्यकर्ते बरोबर होते त्यांना विश्वासात घेवून आपली पुढची दिशा लवकरच जाहीर करणार असल्याचे आगवणे यांनी सांगितले.

सध्या आपण खूप मोठ्या आर्थिक अडचणीत आहे. अडचण लवकरात लवकर दूर होण्यासाठी आपले प्रयत्न सुरु आहेत. अडचणीतून बाहेर आल्यानंतर सगळ्यांचा सगळा हिशोब चुकता करणार असल्याचे आगवणे यांनी सांगितले. ज्यांनी माझ्या पडत्या काळात साथ दिली त्यांना कधीच विसरणार नाही. ज्यांनी साथ दिली नाही त्यांनाही विसरणार नाही असेही आगवणे म्हणाले.

सध्या विविध राजकीय पक्षाकडून मला वेगवेगळ्या ऑफर येत आहेत. परंतु कार्यकर्त्यांशी चर्चा केल्याशिवाय कोणताही निर्णय घेणार नाही. जो काही निर्णय घेईन तो सर्व कार्यकर्त्यांना बरोबर घेवूनच निर्णय घेवू असेही आगवणे यांनी स्पष्ठ केले.

No comments

Powered by Blogger.