Your Own Digital Platform

विडणी येथे शिवजयंती महोत्सवाचे आयोजन
फलटण: संभाजी ब्रिगेड विडणी व माझेरी यांच्या संयुक्त विद्यमाने शिवजयंती महोत्सवाचे आयोजन उद्या मंगळवार दि. 19 रोजी करण्यात आले.

विडणी ता. फलटण येथे दरवर्षीप्रमाणे संभाजी बिग्रेड यांच्यावतीने शिवजयंती महोत्सव साजरा केला जातो यावर्षीही मंगळवार दि.19 फेबुवारी रोजी सायंकाळी 7 वाजता उत्तरेश्वर मंदिराजवळ हा शिवजयंती महोत्सव विविध उपक्रमाद्वारे साजरा केला जाणार आहे. यावेळी प्रसिद्ध शिव व्याख्याते गणेश परताळे यांचे छत्रपती शिवराय व आजचा समाज या विषयावर व्याख्यान होणार आहे. या सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून प्रेमरंग या मराठी चित्रपटातील अभिनेत्री विनिता सोनवणे व दिग्दर्शक शरद गोरे उपस्थित राहणार आहेत.

या कार्यक्रमात महाराष्ट्र केसरी पै. बाळा रफिक शेख, खेलो इंडिया युथ गेम ( बॉक्सींग) सुवर्णपदक विजेती कु. देविका सत्यजीत घोरपडे व माझेरी येथील आदर्श शिक्षक भोलचंद सोमा बरकडे यांना शिवसन्मान गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमास माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील, निवृत्त विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेस युवक जिल्हाध्यक्ष तेजस शिंदे, पंचायत समिती सदस्य श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर, उपसभापती श्रीमंत शिवरुपराजे खर्डेकर, श्रीराम सहकारी साखर कारखाना चेअरमन डॉ. बाळासाहेब शेंडे, मंत्रालयीन सनदी अधिकारी धीरज अभंग, सरपंच सौ. रुपाली अभंग, युवा उद्योजक सचिन भोसले आदी मान्यवर विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत, तरी विडणी व पंचक्रोशीतील ग्रामस्थानीं या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष विशाल शिंदे यांनी केले आहे.