Your Own Digital Platform

श्रीराम बझारच्या कोळकी व लोणंद शाखेचा मंगळवारी वर्धापनदिन

स्थैर्य, फलटण: श्रीराम बझारच्या कोळकी शाखेचा मंगळवार दि. 19 रोजी पहिला व लोणंद शाखेचा 26 वा वर्धापनदिन साजरा होत आहे.

यानिमित्त श्री सत्यनारायण महापूजा तसेच महिलांसाठी हळदीकुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम दहिवडी रोड कोळकी येथील शाखेत तसेच लोणंद येथील शाखेत होणार आहे.

कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन चेअरमन जितेंद्र पवार, व्हाईस चेअरमन दिलीपसिंह भोसले, जनरल मॅनेजर जयराम राजमाने, शाखाप्रमुख रोहिदास अनारसे, लोणंद शाखा कार्यकारी चेअरमन के. के. गायकवाड, शाखा कार्यकारी समिती सदस्य: ज्ञानेश्वर कुचेकर, राजेंद्र शिंदे, विनोद क्षीरसागर, लक्ष्मण शेळके-पाटील, गोविंद पटेल,नंदकुमार डोंबाळे, शाखाप्रमुख तानाजी शिंदे तसेच सर्व संचालकांनी केले आहे.