सयाजी शिंदे भेट देणार देवराई प्रकल्पाला

म्हसवड: अभिनेता सयाजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या सह्याद्री देवराई प्रकल्पच्या माध्यमातून महाराष्ट्रात विविध ठिकाणी झाडांची लागवड करण्यात आली आहे. त्यामध्ये औरंगाबाद, बीड अहमदनगर, सातारा या जिल्ह्यात देवराई उभ्या करुन गेल्या तीन वर्षांत लाखोंच्या संख्येत झाडे लावुन संगोपन आणि संवर्धनाचे काम करत एक चांगला आदर्श घालुन दिला आहे. येणार्‍या काळाची गरज लक्षात घेता अभिनेते सयाजी शिंदे आणि सहकार्यांनी हे काम हाती घेतल आसुन त्यासाठी मोलाचे प्रयत्न चालू आहेत.याला निसर्ग प्रेमिंची ही चांगली साथ मिळत असताना दिसत आहे.

सातारा जिल्ह्यातील दुष्काळी माण तालुक्यात गेल्या वर्षी धामणी या गावात ठिकाणी देवराईच्या माध्यमातून विविध जातीच्या झाडांची लागवड करण्यात आली. हा प्रकल्प पाहण्यासाठी दि. 7 रोजी सांयकाळी चार वाजता धामणी गावातील जोतिबा मंदिर परिसरात भेट देणार आहेत. यावेळी प्रस्तावीत देवराई प्रकल्पासाठी धामणी आणि परिसरातील नरवणे, पिंपरी, काळेवाडी, वडजल, आणि गावामधील निसर्गप्रेमी हजर राहुन सयाजी शिंदे भेट घेणार आहेत. प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, उपजिल्हाधिकारी पुणे सुरेखा माने, तहसीलदार बी. एस. माने, तहसीलदार शेलार उपस्थित राहणार आहेत.

No comments

Powered by Blogger.