तावरे सिटीचे शरद पवारांच्या हस्ते भूमिपूजन संभाजीराजे, सोयरा राणीसाहेब, पुतळा राणीसाहेब, राणूआक्काही येणार

फलटण : माळेगाव ता.बारामती येथील तावरे सिटी या भव्य प्रकल्पाचा भूमिपजून समारंभ व भव्य शेतकरी मेळावा आज दिनांक 3 फेब्रुवारी रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या शुभ हस्ते संपन्न होणार आहे. हा कार्यक्रम महाराष्ट्र राज्य विधानपरिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे, अशी माहिती व्ही.एन.एस. निर्माण ग्रुपचे सचिन भोसले यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली. स्वराज्यरक्षक मालिकेतील छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका बजावणारे डॉ.अमोल कोल्हे समवेत छत्रपती शिवाजी महाराज यांची भुमीका बजावणारे शंतनू मोघे, छत्रपती सौ. पूतळाराणीसाहेब यांची भूमिका बजावणार्‍या सौ.पल्लवी वैद्य, छत्रपती सौ.सोयराराजे यांची भूमिका बजावणार्‍या स्नेहलता वसईकर, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मुलीचे राणू आक्का यांची भूमिका बजावणार्‍या अश्‍विनी महांगडे यांची विशेष उपस्थितीत कार्यक्रम संपन्न होणार आहे.

दिनांक 3 फेब्रुवारी 2019 रोजी माळेगाव तालुका बारामती येथे व्ही.एन.एस. निर्माण ग्रुपच्या तावरे सिटी या प्रकल्पाचा भूमिपूजन समारंभ आज दिनांक 3 आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमास माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार सौ.सुप्रियाताई सुळे, उपस्थितीत पार पडणार आहे. या कार्यक्रमास आमदार दत्तात्रय भरणे, दीपक चव्हाण, माजी आमदार अशोक पवार, अग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचे चेअरमन राजेंद्र पवार, पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्‍वासराव देवकाते, पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य रोहितदादा पवार, माळेगावचे शिवराजसिंह राजेजाधवराव, माजी नगराध्यक्ष सदाशिव (बापू) सातव, बी.व्ही.ग्रुपचे हनुमंतराव गायकवाड, फलटण पंचायत समितीचे सदस्य श्रीमंत विश्‍वजितराजे नाईक निंबाळकर, सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख, बारामती तालुका राष्ट्रवादी काँगेस पार्टीचे अध्यक्ष संभाजी नाना होळकर, बारामती पंचायत समितीचे सदस्य संजय भोसले, जेष्ठ विधी तज्ञ डॉ.ऍड.एस.ई.आव्हाड, सद्गुरू संस्था समूहाचे संस्थापक दिलीपसिंह भोसले, ऍड.जे.पी.धायतडक यांची उपस्थितीत सोहळा संपन्न होणार आहे.

व्ही.एन.एस. निर्माणची यशस्वी वाटचाल

गेल्या काही वर्षांपासून विडणी तालुका फलटण येथील सचिन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व्ही.एन.एस. निर्माण ग्रुप यशाची शिखरे गाठत आहे. गत काही वर्षांमध्ये 16 भव्य प्रकालापाचे काम पूर्ण झाले असून येत्या काही दिवसात अजून 12 प्रक्लप पूर्ण होत आहेत. व्ही.एन.एस. ग्रुपचा मुख्य उद्देश प्रत्येकाला आपल्या हक्काची सावली असणारे घर हवे असा असून व्ही.एन.एस. निर्माण ग्रुप मधील सर्वच जण अहोरात्र काम करत आहेत. या ग्रुप मुख्य उद्देश गरजूना कमी किमतीत आपल्या हक्काचे घर निर्माण करणे असून सन 2035 पर्यंत 5 लाख गरजूना आपल्या हाकचे घर देणे व 1 हजार उद्योजक तयार करणे असा आहे.

व्ही.एन.एस. निर्माण ग्रुपच्या माळेगाव (बारामती) तावरे सिटीची वैशिष्ठये

* नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळापासून 1 तासाच्या अंतरावर

* नियोजित रेल्वे स्थानकापासून 15 मिनिटाच्या अंतरावर

* बारामती बस स्थानकाच्या 15 मिनिटाच्या अंतरावर

* शारदानगर शैक्षणिक संकुलापासून 10 मिनिटाच्या अंतरावर

* सर्व प्रशासकीय कार्यालयापासून 10 मिनिटाच्या अंतरावर

* कृषी विज्ञान केंद्रापासून 5 मिनिटाच्या अंतरावर

* विद्या प्रतिष्ठानच्या शैक्षणिक संकुलापासून 20 मिनिटाच्या अंतरावर

* प्रशस्त रस्ते, रस्त्याच्या दोन्ही बाजूला स्ट्रीट लाईट, अंतर्गत ड्रेनेज सिस्टीम, स्वत्रंत्र पाण्याची व्यवस्था, 24 तास सिक्यूरिटी, प्रशस्त व्यायामशाळा व स्विमिंग टँक, प्रशस्त गार्डन व चिल्ड्रन प्ले एरिया. 1000 व्यापारी शॉप्स, 500 प्लॉट्स व बंगलो, 32 एकरातील भव्य प्रकल्प

No comments

Powered by Blogger.