कमिन्सविरोधात ठिय्या आंदोलनाचा आगवणेंचा इशारा

फलटण : कमिन्स कंपनी मध्ये स्थानिक व प्रकल्पग्रस्त मुलांना नोकर्‍या व ठेके (कॉन्ट्रॅक्ट) दिली जात नसल्याने कंपनी व कंपनीच्या प्रशासना विरोधात ठिय्या आंदोलन व रास्ता रोको करणार असल्याचे निवेदन नायब तहसीलदार नंदकुमार भोईटे यांना दिगंबर आगवणे यांनी दिले आहे.

दिगंबर आगवणे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की कमिन्स कंपनी साठी सुरवडी, नांदल, ढवळेवाडी(निंभोरे)या गावातील लोकांनी जमिनी दिल्या मात्र त्या शेतकर्‍यांच्या मुलांना कंपनी ने नोकर्‍या दिल्या नाहीत तसेच कंपनी नियमानुसार व सरकारने ठरवलेल्या नियमावली प्रमाणे स्थानिकांना 80% नोकर्‍या दिल्या पाहिजेत मात्र तसे घडत नसून स्थानिक फलटण तालुक्यातील मुलांवर हा अन्याय होत आहे या मुळे सोमवार दि.18 फेब्रुवारी रोजी कमिन्स कंपनी समोर ठिय्या आंदोलन करून रास्ता रोको करणार असल्याचे दिगंबर आगवणे यांनी सांगितले आहे.

यापुर्वी अनेक वेळा कमिन्स कंपनी विरोधात आंदोलने केली मात्र कंपनीने कोणत्याही स्थानिक मुलांना नोकरी अथवा टेंडर दिली नाहीत उलट आमच्यावर गुन्हे दाखल झाले या मुळे प्रशासन ही त्यांच्यावर कारवाई करीत नसल्याने व स्थानिक मुलांच्या हक्काच्या नोकर्‍या मिळत नाहीत या मुळे आता स्थानिक तालुक्यातील मुलांच्या हक्कासाठी ठिय्या आंदोलन व रास्ता रोको करणार असून या मधून कायदा व सुव्यवस्था प्रश्‍न निर्माण झाल्यास कमिन्स कंपनी जबाबदार राहील असे दिगंबर आगवणे यांनी निवेदनात म्हटले आहे.

No comments

Powered by Blogger.