Your Own Digital Platform

शरीरसंपदा हीच खरी मौल्यवान संपत्ती- आ. शिवेंद्रसिंहराजे

विजेत्या खेळाडूंचा सन्मान करताना आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि मान्यवर

सांगलीचा विश्वनाथ बकाली आमदार श्री 2019 किताबाचा मानकरी

सातारा- आजच्या फास्ट फूडच्या युगात मानवी आरोग्य सांभाळणे आणि फिट राहणे काळाची गरज बनली आहे. मन आणि शरिर तंदरुस्त ठेवण्यासाठी व्यायाम गरजेचा आहे. सकस आहाराबरोबरच व्यायाम करणे अत्यावश्यक असून शरिरसंपदा हीच खरी मौल्यवान संपत्ती आहे, असे प्रतिपादन आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले.

सातारा येथील गांधी मैदानावर घेण्यात आलेल्या आमदार श्री 2019 या विभागीय शरिर सौष्ठव स्पर्धेत सांगली येथील शरीरसौष्ठपटू विश्वनाथ बकाली याने विजेतेपद पटकावले. बेस्ट पोजर म्हणून रजत शिंदे (सातारा) तर, मोस्ट मस्क्यूलर म्हणून आदिल बागवान (सातारा) यांना गौरवण्यात आले. विजेत्या खेळाडूंना आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या हस्ते बक्षिस वितरण करण्यात आले. याप्रसंगी आ. शिवेंद्रसिंहराजे बोलत होते. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आ. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले की, शरिरसौष्ठव स्पर्धा पाहिली की तरुणांच्या मनात आपणही अशीच पिळदार शरीरयष्टी बनवली पाहिजे अशी इच्छा जागृत होते. त्यामुळे अशा स्पर्धा सातात्याने झाल्या पाहिजेत जेणेकरुन मुलांमध्ये व्यायामाची आवड निर्माण होईल.

पंच म्हणून राजेंद्र हेंद्रे, मुरली वत्स, संदीप यादव, इनायत तेरदाळकर, अ‍ॅड. नितीन माने, सौ. दिया बगाडे, अमित कासट, अ‍ॅड. सचिन तिरोडकर, अ‍ॅड. शार्दुल टोपे, दीपक माने यांनी काम पाहिले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आयोजक निखिल प्रभाळे, सुरज कापसे, शुभम पलंगे, सोनू कांबळे, निखिल भोसले, मनिष चव्हाण, अनिकेत क्षिरसागर, दिपक चव्हाण, अमोल सकटे, धनंजय चौगुले यांनी परिश्रम घेतले.