गृह, वाहन कर्ज स्वस्त होणार; आरबीआयकडून व्याजदर कपात
नवी दिल्ली: रिझर्व्ह बँकेनं आज द्वैमासिक पतधोरण जाहीर केलं आहे. रेपो रेटमध्ये 0.25 टक्क्यांची कपात केली आहे. त्यामुळं आता रेपो रेट 6.50 टक्क्यांवरून 6.25 टक्के झाले आहेत. रिझर्व्ह बँकेच्या या निर्णयामुळं बँकांचे व्याजदर कमी होऊन, गृह आणि वाहन कर्ज स्वस्त होण्याची शक्यता आहे.

चला उर्जित पटेल ला ह्याच कारणाकर्ता हकालले ना !! फेकू ला आपल्या मर्जी नुसार जनतेला सो कॉल्ड अच्छे दिन दाखवायचे आहेत..निवडणूक संपली की रेट पुन्हा वाढवून द्यायचे...मज्जाच मजा !!

Aरिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीच्या सहापैकी चार सदस्यांनी रेपो रेटमध्ये कपात करण्याच्या निर्णयाचे समर्थन केले. तर विरल आचार्य आणि चेतन घाटे यांनी कपातीच्या बाजूने नव्हते. रेपो रेटमध्ये 0.25 टक्के कपात करण्यात आली आहे. रेपो रेट 6.50 टक्क्यावरून 6.25 टक्क्यांवर आले आहेत. तर रिव्हर्स रेपो रेटमध्येही कपात करून 6 टक्क्यांवर आणले आहेत. कपातीमुळं सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. गृह आणि वाहन कर्जे स्वस्त होण्याची शक्यता आहे.

No comments

Powered by Blogger.