लोणंदला ४४ लाखांचा गुटखा जप्‍त; टेंपो पकडलालोणंद : लोणंद-सातारा रस्त्यावर गोटेमाळ येथे पान मसाला व रॉयल सुगंधीत तंबाखूचा सुमारे 44 लाखांचा माल लोणंद पोलिसांनी जप्त केला. या कारवाईवेळी आयशर टेंपोही ताब्यात घेण्यात आला आहे.
लोणंद पोलिस ठाण्याचे सपोनि गिरीश दिघावकर यांना पेट्रोलिंग करताना गुटखा घेऊन टेंपो जात असलेला आढळून आला. सकाळी 8 च्या सुमारास सपोनि गिरीश दिघावकर यांनी स. फौ. वाघमारे, पो.कॉ. व्ही. बी. शिंदे यांच्यासमवेत सापळा लावून ही कारवाई केली. टेंपोमध्ये 342 पोती आढळून आली. त्यामध्ये सुमारे तीन टन वजनाचा बंदी असलेला पान मसाला व रॉयल 717 सुगंधीत तंबाखू असे दोन प्रकार होते. याबाबत अन्न व औषध प्रशासन साताराचे अन्न सुरक्षा अधिकारी आर. एम. खंडागळे, आर. आर. शहा, व्ही. आर. सोनवणे यांनी पाहणी करून गुटखा जप्त केला. याप्रकरणी लोणंद पोलिस ठाण्यात आर. एम. खंडागळे यांनी फिर्याद दिली .

याप्रकरणी टेम्पो चालक शेख (रा. श्रीगोंदा) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलीस उपअधिक्षक डॉ. अभिजीत पाटील यांनी भेट देऊन पाहणी केली. पुढील तपास सपोनि गिरिश दिघावकर करत आहेत. ही कारवाई पोलिस अधिक्षक पंकज देशमुख, अतिरिक्‍त पोलिस अधिक्षक धीरज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

No comments

Powered by Blogger.