आपल्या हक्काचे डिजिटल नेटवर्क

फलटणला चांगली क्रिडा परंपरा: दत्तात्रय नाळे

सिद्धीराज, रोहन,विरेंद्र,ओम यांना पदके
फलटण: फलटण ला खुप चांगली क्रिडा परंपरा कायम असून, त्याचाच एक भाग म्हणून मुधोजी क्लब दरवर्षी बॅडमिंटन स्पर्धा आयोजित करते. या स्पर्धेचा दर्जा अत्यंत चांगला असतो व यामुळे फलटण बरोबर इतर ठिकाणच्या मुलांनाही फायदा होतो. यासाठी मुधोजी क्लब चे कौतुक वाटते. मी स्वत सुद्धा रोज इथेच व्यायामासाठी येत असतो, असे प्रतिपादन पो. नि. दत्तात्रय नाळे यांनी केले.

प्रतिवर्षी प्रमाणे प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या बॅडमिंटन स्पर्धेचे प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. याप्रसंगी पो.नि. मांजरे साहेब, प्रायोजक निलेश निंबाळकर, बिल्डर्स असोसिएशन चे चेअरमन राहुल नलवडे उपस्थित होते.

मुधोजी क्लबचे सचिव राजीव नाईक निंबाळकर म्हणाले की, 2003 पासून 15 ऑगस्ट व 26 जानेवारी रोजी बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन करत आहोत. यामुळे फलटणचे काही खेळाडू राष्ट्रीय पातळीवर पोहोचले आहेत.

या स्पर्धेसाठी फलटण, बारामती, पुणे, नगर इ ठिकाणचे 150 स्पर्धक सामिल झाले होते.

स्पर्धेचे निकाल खालीलप्रमाणे
13 वर्षाखालील गट

विजेत: सिद्धीराज भोईटे, प्रणव शिंदे-फलटण

उपविजेते: संस्कार शिवशरण, सलील मणेरी - वालचंदनगर

18 वर्षाखालील गट

विजेते: विरेंद्र गुंजवटे,ओम पवार -फलटण

अनिकेत लोणकर, विवेक तावरे - माळेगाव

पुरूष गट

विजेते:रोहन जाधव, गणेश सपकाळ -फलटण

उपविजेते : तेजस पवार, जितेंद्रकुमार - अहमदनगर

40 वर्षावरील गट

विजेते : जितेंद्र आटोळे, तुषार गदादे-बारामती

उपविजेते : सुनील जंगम, मोहन यादव-फलटण

सर्व विजेत्यांना मेडल, सर्टिफिकेट, रोख बक्षीस व कै. सुभाषराव निंबाळकर यांच्या स्मरणार्थ निलेश निंबाळकर यांच्या हस्ते ट्रॉफी देण्यात आली.

बक्षीस वितरण समारंभास दादासाहेब चोरमले, विक्रम झांजुर्णे, प्रवीण नाईक निंबाळकर, डॉ. गोसावी, प्रमोद जगताप उपस्थित होते.

स्पर्धेचे आयोजन रणधीर भोईटे, शिवराज नाईक निंबाळकर, आदित्य त्रिपुटे, सुरेंद्र पवार, राज जाधव, नरेंद्र जगताप, विवेक चव्हाण बाळासाहेब बाबर यांनी केले.