Your Own Digital Platform

खासदार उदयनराजेंनी भाजपात जावे; राष्ट्रवादीकडून सतत अपमान होतोय

कोणी मिसळ खावू दे नाहीतर दहीमिसळ फरक पडत नाही; कार्यकर्त्यांची भावना

स्थैर्य, साता
रा : खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे यांनी भारतीय जनता पार्टीत जावे, असा सूर त्यांच्याच कार्यकर्त्यांनी आळवला आहे. राष्ट्रवादीत आपला अपमान होत असल्याची भावना कार्यकर्त्यांची आहे. एव्हाना राष्ट्रवादीकडून आपल्याला काय मिळाले? असा सवालही राजे समर्थक विचारु लागले आहेत. कोणी मिसळ खावू दे, नाहीतर दहीमिसळ कोणताही फरक पडणार नाही, असेही कार्यकर्त्यांनी स्पष्ट केले आहे.

स्थैर्य, सातारा : खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे यांनी भारतीय जनता पार्टीत जावे, असा सूर त्यांच्याच कार्यकर्त्यांनी आळवला आहे. राष्ट्रवादीत आपला अपमान होत असल्याची भावना कार्यकर्त्यांची आहे. एव्हाना राष्ट्रवादीकडून आपल्याला काय मिळाले? असा सवालही राजे समर्थक विचारु लागले आहेत. कोणी मिसळ खावू दे, नाहीतर दहीमिसळ कोणताही फरक पडणार नाही, असेही कार्यकर्त्यांनी स्पष्ट केले आहे.

खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे समर्थकांची बैठक काल सोमवार (दि. 4) रोजी येथील कल्याण रिसॉर्ट येथे झाली. त्यावेळी कार्यकर्त्यांनी उद्वीग्न होवून आपल्या भावना मांडल्या.

यावेळी सुनील काटकर, जितेंद्र खानविलकर, संग्राम बर्गे, जयवंत पवार, नितीन शिंदे, संदीप शिंदे, प्रताप शिंदे, बबलू साळुंखे, किशोर शिंदे, राजेंद्र यादव, विजय यादव, माजी नगराध्यक्ष रंजना रावत, विकास शिंदे, गणेश जाधव व सातारा जिह्यातील खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दरम्यान, अ‍ॅड. दत्ता बनकर म्हणाले, उदयनराजे यांनी निवडणुकीची अजिबात काळजी करु नये. जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीची जय्यत तयारी सुरू आहे. निवडणूकीची सगळी तयारी झाली असून, खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजेंना विरोध करतात त्यांची ही वेळ लवकरच येणार आहे. कोणी मिसळ खावो की, दही मिसळ कोणताही फरक पडणार नाही. जे करायचे ते योग्य वेळी दाखवले जाईल, असा स्पष्ट इशारा बनकर यांनी दिला.

या बैठकीत राष्ट्रवादी विरोधी सूर उमटला त्याची कोंडी संग्राम बर्गे यांनी फोडली. खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजेंनी विकासाच्या मुद्यावर भाजपबरोबर जाण्याची सूचना थेटपणे समर्थकांच्या वतीने केली. खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे यांना पक्षात सतत बाजूला ठेवण्याचा प्रयत्न झाला त्यामुळे राष्ट्रवादीकडून प्रत्यक्षात काय मिळाले? असा सवाल बर्गे यांनी उपस्थित केला.

सुनील सावंत यांनी ही वैयक्तिक नातेसंबंधाच्या दबावाचा दाखला दिला. मात्र, खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे हेच आमचे नेतृत्व आहे. त्यामुळे दुसरे कोणाचेच काम करणार नाही असे सावंत यांनी स्पष्टपणे सांगितले.

दरम्यान, राष्ट्रवादी विरोधी सूर सातत्याने उमटत राहिला. मात्र, काही कार्यकर्त्यांनी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे यांची उमेदवारी राष्ट्रवादीकडून ‘कन्फर्म’ आहे, असा दाखला काही आमदारांच्या हवाल्याने दिला. राष्ट्रवादीचे सुप्रिमो माजी केेंद्रीय कृषी मंत्री खासदार शरद पवारांच्या आदेशानंतर सर्व आमदारांना उदयनराजे यांचे काम पक्ष म्हणून करावेच लागणार आहे. यासंदर्भात खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे यांनी कोणताही वेगळा विचार करू नये असे सुचवण्यात आले. खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे यांना कोंडित पकडण्याचा जो प्रयत्न झाला त्याचे सोदाहरण दाखले बैठकीत देण्यात आले. त्यामुळे तातडीने निर्णय घ्यावा लागेल, असे सुचवण्यात आले.

या सर्व घडामोडींवर खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल अशी भावना यावेळी सर्वांनी व्यक्त केली.

या बैठकीचे नियोजन संग्राम बर्गे, सुनील काटकर, गणेश जाधव, अ‍ॅड.दत्ता बनकर यांच्या पुढाकाराने करण्यात आले होते. सर्व कार्यकर्त्यांना आपले मत मनमोकळेपणाने मांडण्याची संधी देण्यात आली होती. विजयसिंह नायकवडी यांनी थेटपणे उदयनराजे जो निर्णय घेतील आणि जो आदेश देतील तो आम्हाला मान्य असेल असे जाहीरपणे सांगत आपल्या उत्स्फूर्त भावना व्यक्त केल्या.