Your Own Digital Platform

शिखर शिंगणापूरला भाविकांची अलोट गर्दी

रात्री 12 वाजता महापूजा व बेलार्पण सोहळा संपन्न; ‘हर हर, महादेव’चा जयघोष

स्थैर्य, शिखर शिंगणापूर
: महाशिवरात्री निमित्त शिखर शिंगणापूर ला भाविकांची अलोट गर्दी केली होती सोमवार पहाटे 3 पासून भाविकानंसाठी मंदिर खुले करण्यात आले होते महानाडकर सालकरी यांच्यावतीने महाशिवरात्री निमित्त मुख्य शंभू महादेव मंदिरात सजावट करण्यात आली होती तर फुलमाळा व तोरणाची सजावटविशेष आकर्षण ठरत होते रात्री 12 वाजता सालकरी मानकरी यांच्या उपस्तीतीत महापूजा व बेलार्पण सोहळा संपन्न झाला हरहर महादेव गर्जनेने शंभू महादेव मंदिर परिसर यावेळी दणाणून गेला होता

शिंगणापूर मध्ये गुरुवार 28 फेबुरवरी पासून महाशिवरात्री उसत्व सोहळा सुरू आहे त्यानिमित्ताने संपूर्ण मंदिरास फुलमालांचे तोरण बांधण्यात आले तर मंदिरदगडी खांबास बेल फुल मांलाची सजावट करण्यात आली होती महाशीवरात्री सोमवारी आल्याने भाविक भक्तांनी मुख्यमंदिरा मधे प्रचंड गर्दी केली होती सोममहाशिवरात्री हामोठायोग मानला जातो सुमारे 12वर्षे म्हणजे एक तपाने हायोग येतअसल्याचे जाणकारांचे मत आहे प्रतिवर्षी प्रमाणे यामपूजा म्हणजे मुख्यशिवपिंडीच्या त्रिकालप्रहरपूजा करण्यात आल्या मध्यानरात्री 12 ,26 ते 1,15 मंगलपर्व काळी महाशिवरात्री महापूजा करण्यात आली यावेळी पंचक्रोशी सहराज्यातील कानाकोपर्‍यातून शिवभक्तांनी गर्दी केली होती हरहर महादेव गर्जनेत मध्यानरात्र महापूजा संपन्न झाली

सातारा,वडूज,दहिवडी,फलटण एसटी प्रशासनाने ज्यादा बसेसची सोय केली होती तर पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता उमबनामध्ये वाहनतळ केल्याने शंभू महादेव मंदिर परिसरामध्ये वाहनांची कोंडी झाली नाही दरम्यान दिवसभर मुख्यप्रशासकीय आधिकारी,लोकनेते, विविध संस्थाचे पदाधिकारी, यांनी महाशिवरात्री निमित्त शिवपिंडीचे दर्शन घेतले इतर भविकभक्तांना सुमारे दोन ते तीनतास देवदर्शन अभिषेकास लागत होते उत्साही वातावरणात महाशिवरात्री महोत्सव पार पडला मंदिर परिसरातही पोलीस बंदोबस्त असल्याने अनुचित प्रकार घडला नाही.