शरद पवार माझ्यामुळेच रिंगणात;

कवी मनाचे नेते अभिजीत बिचुकले यांचे मत

स्थैर्य, सातारा : आपण स्वत:ची पंतप्रधानाची उमेदवारी जाहीर केल्यामुळे शरद पवारांना निवडणुकीच्या रिंगणात यावे लागत असल्याचे मत कवी मनाचे नेते अभिजीत बिचुकले यांनी पत्रकार परिषदेत केले.

खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे माझे दादा असले तरी त्यांच्या आजुबाजुला असणार्‍या चांडाळ चौकडीमुळे आपण त्यांच्या विरोधात निवडणुक लढवणार असल्याचे बिचुकले यांनी स्पष्ट केले.

बिचुकले म्हणाले, यांनी अखिल बहुजन समाजसेवा पक्षातर्फे विधानसभेच्या निवडणुकीत 288 जागा लढवणार आहोत. आगामी निवडणुकीत या पक्षाचाच मुख्यंमत्री असणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पंतप्रधान मोदींना आपण स्वत: म्हणजेच अभिजीत बिचुकले हे राष्ट्रपतीपदासाठी इच्छुक असल्याचे समजल्यानंतर लगेचच राष्ट्रपतीपदावर मागासवर्गीय रामनाथ कोविंद विराजमान केले. माझ्या उमेदवारी मुळेच मोदींना हा निर्णय घ्यावा लागला, असे त्यांनी सांगीतले.

उदयनराजे भिम तर... मी हनुमान..

श्रीमंत छत्रपती उदयनराजे हे माझे दादा आहेत ते राजकारणातील भिम आहेत पण मी पण हनुमान आहे. त्यांनी माझ्या शेपटीला हलवून दाखवावे असा इशारा बिचुकले यांनी खासदार श्रीमंत उदयनराजेंना दिला.

No comments

Powered by Blogger.