Your Own Digital Platform

व्हिडीओ कॉन्फरन्सींगच्या दरम्यान राष्ट्रवादीने वाद टाळला

जिल्हा बँकेच्या सभागृहात शरद पवारांची व्हिडिओ कॉन्फरन्स;


स्थैर्य, सातारा : राष्ट्रवादी काँगे्रसच्या वतीने येथील जिल्हा बँकेच्या सभागृहात आयोजित केलेल्या बुथ कमिटीच्या बैठकीकडे खासदार उदयनराजे भोसले यांच्या समर्थकांनी पाठ फिरवली. पक्षाध्यक्ष खासदार शरद पवार व प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील हे बुथ कमिट्यांच्या प्रतिनिधींशी या बैठकीत चर्चा केली.

राष्ट्रवादी काँगे्रस पक्षाच्या बुथ कमिटी अध्यक्ष व सदस्यांशी यावेळी संवाद साधण्यात येणार असल्याने राष्ट्रवादीचे जिल्ह्यातील बहुतांश आमदार उपस्थित होते. जिल्हाध्यक्ष सुनील माने, सरचिटणीस राजकुमार पाटील, सारंग पाटील, महिला जिल्हाध्यक्षा जयश्री पाटील यांनी जय्यत तयारी केली होती.

खासदार शरद पवार म्हणाले, ‘आगामी लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी व काँगे्रसच्या बुथ कमिटी सदस्यांना विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. भंडारा, गोंदिया जिल्ह्यांतील मतदान केंद्रांवर मागील वेळी जो प्रकार झाला, तो सर्वांना माहित आहे. आता सर्व केंद्रांवर कार्यकर्त्यांनी दक्षता बाळगावी लागणार आहे. देशाला परिवर्तनाची गरज आहे.’

दरम्यान, यावेळी जिल्ह्यातून आलेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून खा. पवार यांनी प्रश्न जाणून घेतले. संतोष बर्गे (चिंचणेर), मधुकर निंबाळकर (कोंडवे), संतोष बाबर (किकली) यांनी यावेळी खा. पवार यांना प्रश्न विचारले. मराठा, धनगर आरक्षण, खतांचे वाढलेले दर, पाणीपुरवठा सहकारी संस्थांच्या अडचणी, वाढलेले वीजबिल यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आले. ‘शासनाने सर्वच बाबतीत दिलेली आश्वासने पाळलेली नाहीत. त्यामुळे संघटित राहून सरकारविरोधात आवाज उठवावा,’ असे आवाहन खासदार पवार यांनी यावेळी केले.

वाई-खंडाळा-महाबळेश्वर, सातारा-जावळी, फलटण, कोरेगाव, पाटण, कजहाड उत्तर, कजहाड दक्षिण या विधानसभा मतदार संघातील कामाचा आढावा यावेळी घेण्यात आला. कजहाड उत्तरमध्ये राष्ट्रवादीच्या बुथ कमिटींचे काम उत्तम असून, कजहाड दक्षिण व सातारामध्ये आणखी गतीने काम करावे लागणार असल्याच्या सूचना प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी केल्या.

वैयक्तिक टिका-टिप्पणी करु नका;

कॉन्फरन्सच्या प्रारंभीच ‘तंबी’


प्रारंभीच आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि आमदार बाळासाहेब पाटील यांनी कुणीही वैयक्तिक टीका-टिप्पणी करू नये, अशा सूचना केल्या.