Your Own Digital Platform

माध्यमांनी विपर्यास केला; रणजितसिंह निंबाळकर हेच उमेदवार : विजयदादास्थैर्य, अकलूज: माध्यमांनी आपल्या बोलण्याचा विपर्यास केला आहे. रणजितसिंह नाईक निंबाळकर हे माझ्या दुसऱ्या मुलासमान आहेत. माढा मतदार संघातून रणजितसिंह नाईक निंबाळकर हेच आमचे उमेदवार असतील, असा विश्वास खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांनी व्यक्त केला.

विजयसिंह म्हणाले, आपण माढ्यातुन निवडणुक लढणार नसुन आपल्या बोलण्याचा विपर्यास केला गेला. आपणाला दोन्ही रणजितसिंह सारखेच असल्याचे सांगुन लोकसभा लढण्याच्या अफवावर पडदा टाकला. माढा मतदारसंघातून भाजपचा उमेदवार कोण असेल अशी चर्चा सुरू आहे, पण नाव घोषीत होत नव्हतं.

विजयसिंह आणि रणजितसिंह मोहिते हे निवडणूक लढविण्यास इच्छुक नाहीत अशा नुकताच भाजपामध्ये प्रवेश केलेले काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना माढ्यातुन उमेदवारी निश्चित मानली जात आसुन आज संध्याकाळ पर्यत त्यांची उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता आहे.